बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टी-20 विश्वचषकाचं अँथम रिलीज, विराट-पोलार्ड नवीन अवतारात, पाहा व्हिडीओ

दुबई | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर युएईमध्ये आयपीएल सामने सुरू आहेत. अशातच आता आयसीसीने टी-20 वर्ल्ड कपबाबतचा व्हिडीओ ट्विट करत अँथम लाँच केलं आहे. या व्हिडीओमध्ये एनिमेटेड फिल्म दाखवण्यात आली आहे.

येत्या 17 ऑक्टोबर पासुन टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. सुरूवातीला टी-20 वर्ल्ड कप ओमान आणि युएईमध्ये खेळला जाणार आहे. तर टी-20 वर्ल्ड कपची फायनल दुबईत होणार आहे. आयसीसीने ट्विट केलेल्या एनिमेटेड फिल्म मध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, कायरन पोलार्ड हे वेगळ्याच पद्धतीने दाखवण्यात आले आहेत.

या टी-20 वर्ल्ड कपमध्ये 16 देश सहभागी होणार आहेत. कोरोना सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेला सुरूवात होत आहे. या टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपच 17 ऑक्टोबरला ओमानमध्ये उद्घाटन होणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, आयसीसीने ट्विट केलेली एनिमेटेड फिल्म बॉलीवुडचे दिग्दर्शक अमित त्रिवेदी यांनी केली आहे. या एनिमेटेड फिल्ममध्ये विराट कोहली, कायरन पोलार्ड, राशिद खान आणि ग्लेन मॅक्सवेल यांना दाखवण्यात आल आहे. दरम्यान, आता पर्यंत भारताला एकदाच टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवता आला आहे. तसेच टी-20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहली कर्णधारपद सोडणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

“सेना-राष्ट्रवादीच्या संगतीमुळे काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची भाषा बिघडली”

“शिवसेनेचे सर्वज्ञानी खासदार संजय राऊत, सांगा आता थोबाड कोणाचं फोडायचं?”

“भारताने जे केलं ते कोणीही करू शकलं नाही”; सर्वोच्च न्यायालयाने केलं केंद्राचं कौतुक

काय सांगता! अवघ्या 33 हजारांमध्ये मिळतेय बजाज डिस्कव्हर बाईक

आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ, विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर भरघोस चुका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More