बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ जिल्ह्यात लसीकरणाच्या रांगेतील नागरिकांचीही अँटिजेन टेस्ट करणार!

जालना | जालन्यात आता कोरोनाची लस घेण्यासाठी रांगेत उभे राहणाऱ्यांचीही अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे. यामुळे जालन्यातील लसीकरण आणि कोरोना चाचणीचं काम वेगाने होणार आहे.

जिल्ह्यात सुरु असलेल्या लसीकरणाच्या ठिकाणी रांगेमध्ये उभे असलेल्या नागरिकांची अँटीजेन तपासणी करण्यात यावी. जेणेकरुन नागरिक बाधित असल्यास त्याच्यापासून दुसऱ्याला होणारा संसर्ग रोखण्यास मदत होण्याबरोबरच लसही वाया जाणार नसल्याचं राजेश टोपे म्हणाले.

राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज कोरोनाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. यावेळी राजेश टोपे बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे उपस्थित होते.

डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसमवेत त्यांचे नातेवाईक थांबत असल्याचे निर्दशनास येत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात फैलावू शकत असल्याने कुठल्याही ठिकाणी बाधित रुग्णासोबत नातेवाईक थांबणार नाहीत, याची दक्षता घ्या, असे आदेश टोपे यांनी दिलेत. तसेच बाधित असलेल्या प्रत्येक रुग्णांशी डॉक्टरांनी फोनद्वारे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत त्यांना होत असलेल्या त्रासाची माहिती दरदिवशी जाणून घेऊन त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करा, असं राजेश टोपेंनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

मन सुन्न करणारी घटना; कोरोनाबाधित पतीच्या डोळ्यांदेखत पत्नीसोबत घडला धक्कादायक प्रकार

आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा! कोरोनामुळे होणाऱ्या ‘या’ आजारावर होणार मोफत उपचार

‘माझी आठवण काढाल तेव्हा हसून आठवण काढा’; व्हिडीओ पोस्ट करत 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या

दिलासादायक! पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, बरे होणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली

‘कामे वेळेत आणि दर्जेदारपणे पू्र्ण करा, अन्यथा…’; अशोक चव्हाणांनी कंत्राटदारांना भरला दम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More