…पण आधी मला एक किस दे, अनू मलिकने केली होती मागणी; या गायिकेचा आरोप

मुंबई | गायक अनू मलिकवर आणखी एका गायीकेने गंभीर आरोप केला आहे. काही बड्या गायकांसोबत गाण्याची संधी देण्याच्या बदल्यात आपल्याकडे किस मागितल्याचा आरोप गायीका श्वेता पंडित हिने ट्विटरवरून केला आहे.

2001 मध्ये अनी मलिक यांचे मॅनेजर मुस्तफा यांचा मला फोन आला. त्यांनी मला एम्पायर स्टुडीओमध्ये बोलावलं. मी खूप उत्सुक होते. अनू मलिक यांनी मला म्युझिकशिवाय गायला सांगितलं. ‘हर दिल जो प्यार करेगा’ हे गाणं मी गायले. ते खूप खुश झाले. ते म्हणाले की, ‘मी तुला शान आणि सुनिधी चव्हाण बरोबर गाण्याची संधी देईन, पण आधी मला एक किस दे.’ मी घाबरले. मी केव्हा 15 वर्षाची होते. कुणीतरी माझ्या पोटात सुरा खुपसल्यासारखं मला वाटलं, असं तीने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, मी त्यांना अनू अंकल म्हणायचे. त्यांना दोन मुली असताना ते एका अल्पवयीन मुलीशी असं वागले? यानंतर मी निराश झाले. माझ्या मनावर आघात झाला. मी फिल्म इंडस्ट्री सोडण्याच्या विचारात होते. पण एका शोषणकर्त्यासाठी मी माझी पॅशन का सोडावी, असा विचार करुन मी लढत राहिले, असंही तीनं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-एन.डी.तिवारींच्या अंतिम दर्शनात मुख्यमंत्री योगी आणि मंत्र्यांचा हास्यकल्लोळ! व्हिडिओ व्हायरल

-‘जलयुक्त शिवार’चा फुगा फुटला, कुठे आहेत ती १६ हजार गावं? अजित पवारांचा सवाल

-…. अखेर मुहूर्त ठरला; या दिवशी चढणार बाजीराव-मस्तानी बोहल्यावर!

-सदाशिव लोखंडेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर; शिवसेना प्रमुखांची घोषणा!

-त्या रात्री नेमकं काय घडलं?; अमृतसर दुर्घटनेतील ड्रायव्हरनं दिलं लेखी उत्तर

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या