मनोरंजन

तनुश्री दत्ताची नेहा कक्करवर जोरदार टीका; म्हणते…

मुंबई | अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नेहा कक्करवर जोरदार टीका केली आहे. अनु मलिकवर मीटू मोहिमेअंतर्गत आरोप झालेले असतानाही गायिका नेहा कक्कर त्यांच्यासोबत काम कशी करू शकते, असा सवाल तिने उपस्थित केलाय.

अनु मलिक यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यास तिनं नकार दिला. अनु मलिकवर असे आरोप झाले असूनही तिनं मौन सोडलं नाही उलट त्याच्यासोबत ती अजून काम करत आहे. अशा व्यक्तीसोबत काम करताना तिला काहीच कसं वाटत नाही, असा सवालही तिनं विचारलाय.

सोनीसारख्या वाहिनीनं असं काहीसं करावं, याबद्दल मला आश्चर्य वाटत आहे. सोनी स्वत:ला एक कौटुंबिक वाहिनी म्हणवतं आणि वाहिनीवरील एका शोमध्ये महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असणाऱ्या एका पुरूषाला काम देतं, असंही तिने म्हटलं आहे.

मानवी मूल्यांपेक्षा चॅनलसाठी त्यांचा टीआरपी अधिक महत्त्वाचा आहे का? असा सवालही तनुश्रीने उपस्थित केला. अनु मलिक यांनी गायिकांसोबत केलेल्या गैरवर्तनाबद्दल इंडस्ट्रीतील अनेक महिला पुढे येऊन बोलल्या आहेत, असंही तिने म्हटलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या –

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या