मनोरंजन

बच्चन कुटुंबापाठोपाठ बॉलिवूडच्या ‘या’ घरात देखील कोरोनाचा शिरकाव!

मुंबई | अभिनेता अमिताभ व अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानं बाॅलिवूडमध्ये सध्या एकच खळबळ उडाली आहे. बच्चन कुटुंबियांची घटना ताजी असतानाच आता अनुपम खेर यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. अनुपम खेर यांच्या आई दुलारी यांचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटीव्ह आली असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

सध्या मुंबईतील कोकिलाबेन रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यासोबत अनुपम यांच्यासह कुटूंबातील सर्वच सदस्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये अनुपम खेर यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. अनुपम यांचा भाऊ, वहिनी व पुतण्या यांचे रिपोर्ट मात्र पाॅझिटीव्ह आले आहेत.

अनुपम यांच्या कुटूंबातील सर्वच सदस्यांना आता होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. अनुपम यांनी ट्विटरवर व्हिडीओ अपलोड करून याबाबत माहिती दिली आहे. कोकिलाबेन रूग्णालय प्रशासनाचे या व्हिडीयोतून त्यांनी आभारही मानले आहेत.

 

काही दिवसांपासून आपल्या आईला जेवण जात नव्हतं, आई सतत झोपून राहत असे. शेवटी डाॅक्टरांनी आम्हाला कोविड चाचणी करण्याच सल्ला दिला, यादरम्यान आईचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटीव्ह आल्याचं अनुपम यांनी व्हिडीओतून सांगितलं.  तसेच घरातील वयोवृद्ध लोकांना जेवण जात नसेल तर त्यांची त्वरित कोरोना टेस्ट करून घ्या, असं आवाहनदेखील त्यांनी सर्व नागरिकांना केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! ‘One Plus मोबाईल कंपनीनं कपड्यांच्या आरपार पाहता येणारा कॅमेरा बनवला, पण आता…

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, रेखा यांचा बंगला सील!

अमिताभ यांच्या पाठोपाठ अभिषेकचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, सचिन तेंडुलकरचं लगोलग ट्विट, म्हणतो…

शरद पवार मुलाखत स्पेशल बातम्या-

शाळेतून पुस्तके गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा- बच्चू कडू

चीनच्या भारत विरोधी नव्या डावपेचांचा शरद पवारांकडून उलगडा, म्हणाले…

परवा गलवान खोऱ्यामध्ये बंदूक वापरली नाही ‘तो’ आम्ही केलेल्या कराराचा भाग- शरद पवार

आपले शेजारी आपल्याच विरोधात, बिघडलेले संबंध अलीकडच्या काळातील योगदान; पवारांचा हल्लाबोल

“मला मोदींचा गुरू म्हणून उगीच त्यांना अडचणीत आणू नका”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या