Anupam Kher l सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी स्वतःच्या घराबद्दलचा एक मोठा खुलासा केला आहे. यावेळी अनुपम खेर म्हणाले की, माझं हक्काचं असं कोणतं घरच नाही. मात्र आता खेर यांचं हे वक्तव्य मनोरंजन सृष्टीत चर्चेत विषय बनत आहे.
मी कोणासाठी घर घेऊ? :
यासंदर्भात अनुपम खेर म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षांपासून मी भाडेतत्त्वावर राहत आहेत. कारण “मी सध्या भाड्याच्या घरात राहतो. कारण मी सध्या घर विकत न घेण्याचा निर्णय घेतला होता. तर मी कोणासाठी घर घेऊ? त्यापेक्षा दर महिन्याला भाडं भरा आणि राहा. तसेच ज्या पैशांनी तुम्ही घर खरेदी करता, तेच पैसे बँकेत ठेवा आणि घराचं भाडं भरण्यासाठी तेच पैसे वापरा” असं अनुपम खेर म्हणाले आहेत.
Anupam Kher l मी खूप मोठा स्टार आहे :
यावेळी अनुपम खेर हे घर न घेण्यामागचं कारण पटवून देताना म्हणाले की, तुमच्या घरासाठी लोकं भांडण्यापेक्षा तुम्ही गेल्यानंतर ते पैसे वाटून दिलेलं बार. कारण मी माझ्या आईसाठी शिमल्यात एक घर घेतलं आहे. कारण मी सात वर्षांपूर्वी तिला म्हटलं होतं की, मी खूप मोठा स्टार आहे, तर तुला काय हवं ते सांग. तर त्यावेळी मला वाटलं ती म्हणेल की काही नको.
मात्र ती आग्रहाने मला म्हणाली की, मला शिमल्यात घर हवंय. त्यावेळी मी तिला कारण विचारलं. तेव्हा ती म्हणाली की, वडिलांच्या निधनानंतर तुम्ही तिथे राहत नाही, पण मी तिथे माझं संपूर्ण आयुष्य भाड्याच्या घरात राहिले आहे. त्यामुळे शिमल्यात मला हक्काचं घर हवंय. तसेच आईला फक्त वन बेडरूमचं घर हवं होतं, पण तिला मी तब्ब्ल आठ बेडरुमचं घर बांधून दिलं आहे.
News Title : Anupam Kher lives in a rented house
महत्वाच्या बातम्या –
परळीत बहीण भाऊ जोमात! “धनुभाऊंनी कमळाच्या चिन्हावर…”
उद्धव ठाकरेंचा भाजपला जोर का झटका; बडा नेता बांधणार शिवबंधन
खासदार महाडिकांवर गुन्हा दाखल; लाडक्या बहिणींना नेमकं काय म्हणाले?
PM मोदी उद्या पुण्यात; मंगळवारी ‘हे’ रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?
“फडणवीस तुमचे नाही तर आमचे पूर्वज इंग्रजांशी लढले”; ओवैसींचा हल्लाबोल