Top News देश

अनुपम खेर यांच्या आईच्या डोळ्यात मोदींसाठी पाणी; कोरोनाच्या कठीण काळात काळजी घेण्याचा सल्ला

Loading...

नवी दिल्ली |  अनुपम खेर यांच्या आईच्या डोळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अश्रू आले. अनुपम खेर यांनी हा व्हीडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दुलारी खेर पंतप्रधान मोदींसाठी प्रार्थना करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 130 कोटी देशवासियांची काळजी घेत आहेत परंतू त्यांची काळजी कोण घेत आहे? असा सवाल दुलेरी यांनी व्हिडिओमधून विचारला आहे. तसंच त्या मोदींबद्दल बोलताना भावूक झाल्याचंही पाहायला मिळत आहे.

Loading...

अभिनेते अनुपम खेरही सध्याच्या परिस्थितीत आयसोलेशनमध्ये आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशभरातल्या मातांप्रमाणे माझ्या आईलाही तुमच्या आरोग्याची चिंता आहे. तुम्हाला १३० कोटी लोकांची काळजी आहे. पण तुमची काळजी कोण घेतंय, असं ती विचारती आहे, असं अनुपम खेर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बुधवारी केंद्रिय मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली. यावेळी कोरोनाबाबतच्या उपाययोजनांची चर्चा झाली. या बैठकीवेळी सर्व मंत्र्यांमध्ये सोशल डिस्टन्सिग पाहायला मिळालं. यावरून सर्वसामान्य नागरिकांपासून ते पंतप्रधान ते मंत्री सर्व जण सोशल डिस्टन्सिंग पाळत असल्याचं पाहायला मिळालं.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

“लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी समजला का? जयंतरावांनी मोदींवर केलेली टीका योग्यच”

सॉरी उद्धवजी… मला तुमची माफी मागायचीय; मुख्यमंत्र्यांकडे अभिनेत्याचा माफीनामा

महत्वाच्या बातम्या-

मुंबईत आणखी एका महिलेचा मृत्यू; कोरोनाबाधित मृतांची संख्या 5 वर

बेघर, रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी ‘कम्युनिटी किचन’ योजना राबवणार- अजित पवार

कर्जावरील व्याज आकारणी थांबवा, इएमआयवर 6 महिन्यांसाठी बंदी घाला ; सोनिया गांधींनी मोदींना लिहिलं पत्र

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या