…म्हणून अनुपम खेर यांनी दिला एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

पुणे | ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे (एफटीआयआय) अध्यक्ष अनुपम खेर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.   

 माझे भाग्य आहे, की मी प्रतिष्ठित अशा एफटीआयआयचे अध्यक्षपद भूषविले. हा एका चांगला अनुभव असल्याचं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मात्र, माझ्या आंतरराष्ट्रीय असाईनमेंट्समुळे माझ्याकडे संस्थेला जास्त वेळ देता येत नाही. त्यामुळे मी माझ्या अध्यक्षपदाचा राजीनामा पाठवत आहे, असं कारणही त्यांनी ट्वीटमध्ये दिलं आहे.  

दरम्यान, अनुपम खेर यांनी 2017 मध्ये एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतला होता. 

महत्त्वाच्या बातम्या-

-मी हाडाचा शिक्षक आहे त्यामुळे मला लोकसभेत जायला आवेडल- रामराजे नाईक निंबाळकर

-अमेरिकेत जन्माला आले म्हणून नागरिकत्वाचा अधिकार मिळणार नाही!

-उदयनराजेंना रिप्लेस करणार का? रामराजे म्हणतात…

-आता सरकार आणि रिझर्व्ह बँकेत वाद; उर्जित पटेल देणार राजीनामा?

-सरदार पटेल नसते तर चारमिनार पाहण्यासाठी व्हिसा लागला असता!