मुंबई | दिल्लीत सुरू असलेल्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचं अमेरिकन पॅापस्टार रिहाना, पॅार्नस्टार मिया खलिफा यांनी समर्थन केलं. यावर काही सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया देत बाहेरील व्यक्तींनी भारताच्या अंतर्गत प्रश्नावर काही बोलू नये असं म्हटलं आहे. यामध्ये अनुपम खेर यांनी देखाल ट्विट केलं होतं. त्यामुळे निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी संताप व्यक्त केला आहे.
महेश टिळेकर यानी फेसबुकवर एक पोस्ट लिहीली आहे. त्यामध्ये त्यांनी ‘अनुपम खेर अब तो तेरी खैर नही’ असं म्हणत अनुपम खेर यांच्याविरोधात संताप व्यक्त केला आहे. काही कलाकारांची अवस्था आपला राष्ट्रीय पक्षी मोरासारखी आहे. मोराने पिसारा फुलवला की पाहणाऱ्यांकडून त्याचं कौतुक होतं म्हणून मोर खुश असतो. पण पिसारा फुलवणाऱ्या मोराचा पार्श्वभाग हा उघड असतो. अशी अवस्था अनुपम खेर या नटाची आहे. अर्थात अभिनेता म्हणून तो ग्रेटच आहे.
इतर देशातील लोकांनी आंदोलनाचं समर्थन करत ट्विट केलं म्हणून त्यांना अक्कल शिकवणारा हा नट आपल्या देशातील व्यक्ती इतर देशातील एखाद्या घटनेवर ट्विट करतो तेव्हा का नाही टिव टिव करत?, असंही महेश टिळेकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, निळूभाऊ फुले यांच्या एका भेटीनंतर अनुपम खेर मनातून उतरले आहेत असंही महेश टिळेकर यांनी म्हटलं आहे.
हमारे देश के अंदरूनी मामलों में दख़ल देने वाले कुछ विदेशियों के लिए यह शेर अर्ज़ है…
रिंदे ख़राब हाल को ज़ाहिद ना छेड तू ,
तुझको परायी क्या पड़ी अपनी नबेड तू.. 🙂#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda— Anupam Kher (@AnupamPKher) February 3, 2021
थोडक्यात बातम्या-
‘सचिन तेंडुलकर भारतरत्नसाठी पात्र नाही त्याऐवजी…’; या माजी खासदाराने केली सचिनवर टीका
‘ज्यांना कोणाला पक्षात यायचं असेल त्यांना दारं खुली पण…’; राज ठाकरेंची खुली ऑफर
…म्हणून कंगणाची ट्विटरला धमकी; म्हणाली, “टिकटाॅकसारखं तुलाही बॅन करु”
‘अक्षयने लग्नाचं वचन देत मला…’; शिल्पा शेट्टीने अक्षय कुमारवर केले हे धक्कादायक आरोप
महाविकास आघाडीत कुरबुरी; शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून टोचले काॅंग्रेसचे कान
Comments are closed.