बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनुपमा मालिकेतील ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं दु:खद निधन

मुंबई | मराठीसह हिंदी मालिकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री माधवी गोगाटे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 58व्या वर्षी मुंबईतील सेव्हन हिल्स रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. माधवी गोगाटे आणि अनेक मराठी आणि हिंदी मालिकांध्ये अभिनय केला आहे तर सध्या स्टार प्लसवर प्रसारीत होणाऱ्या ‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेतही माधवी गोगाटे यांनी काम केलं होतं.

माधवी गोगाटे यांना कोरोनाची लागण झाली असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. माधवी गोगाटे यांच्या निधनाने कलाविश्वात आणि मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम करण्यापूर्वी माधवी गोगाटे यांनी रंगभूमीदेखील गाजवली आहे. माधवी गोगाटे यांनी रंगभूमीच्या माध्यमातून त्यांच्या कारकिर्दीला सुरूवात केली. रंगभूमीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडल्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. ‘घनचक्कर’,’सत्वपरिक्षा’ यांसारख्या प्रसिद्ध मराठी चित्रपटात त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत.

तर सूत्रधार या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ‘गेला माधव कुणीकडे’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘अंदाज आपला आपला’, अशा अनेक गाजलेल्या नाटकांत त्यांनी काम केलं आहे. तर ‘तुझं माझं जमतंय’ या मराठी मालिकेसह त्यांनी ‘बाबा ऐसा वर ढुंडो’, ‘मंजिल ढुंड लेगी हमे’, ‘कही तो होगा’, ‘अनुपमा’ यांसारख्या प्रसिद्ध हिंदी मालिकांतूनही त्यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटावला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘ते’ चोख काम नवाब मलिकांनी केले आणि महाराष्ट्रावर उपकारच झाले

’75 वर्षात जितकी प्रगती करायला हवी होती तितकी…’, मोहन भागवतांनी केलं मोठं विधान

“राज्यातील वातावरण भाजपकडून गढुळ केलं जात आहे”

किरीट सोमय्या आज दिल्ली दौऱ्यावर, करणार ‘या’ नेत्यांच्या घोटाळ्याची चौकशी

कंगनाचं पुन्हा वादग्रस्त विधान; शीख समुदायाचा ओढवून घेतला रोष

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More