मनोरंजन

“पाकिस्तान नहीं होता तो मोदीजी के पास बात करने के लिए कुछ नहीं होता”

मुंबई | बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप ट्विटरच्या माध्यमातून स्पष्टपणे त्याचे विचार मांडत असतो. तसेच अनेक मुद्द्यांवरून अनुराग कश्यपने याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तसेच भाजपाध्यक्ष अमित शहांवर टीका केली आहे. तसेच पुन्हा एकदा ट्विट करत अनुराग कश्यपने नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

कधी कधी असं वाटतं की पाकिस्तान नसतं मोदीजींकडे बोलायला देखील काही नसतं, असा टोला अनुराग कश्यपने मोदींना लगावला आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

काम तर मोदी तसंही तेव्हाच करतात जेव्हा कॅमेरे त्यांच्या आजुबाजूला असतात, असं म्हणत अनुरागने नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. अनुराग नरेंद्र मोदींवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही.

दरम्यान, अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्यामुळे अनुराग कश्यप याआधी चर्चेचा विषय बनला आहे. अनुराग कश्यपनं याआधीही ट्वीटरच्या माध्यमातून अनेकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच तो अनेक वेळा त्याच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोलही होत असतो.

 

संबंधित बातम्या-

…आणि मोदी-शहांवर टीका करणाऱ्या अनुरागचे लाखो फाॅलोवर्स झटक्यात कमी झाले!

आमचा पंतप्रधान, जनतेचा प्रधान नोकर मुका आणि बहिरा- अनुराग कश्यप

 

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या