बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी महाराष्ट्रात सुरक्षित आहे, उद्धव ठाकरेंमुळे माझी शिवसेनेबाबतची मतं बदलली”

मुंबई | मी महाराष्ट्रात खुश आहे, मला इथं सुरक्षित वाटतं. येथे मला जे बोलायचे आहे ते मी स्पष्टपणे बोलू शकतो, असं मत चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने व्यक्त केलं आहे.

मला महाराष्ट्रात अगदी सुरक्षित वाटतं. मी इथे खुलेपणाने माझी मतं व्यक्त करु शकतो. मागील काळातील अनेक घटनाक्रमामुळे माझ्या मनातील शिवसेनेची प्रतिमा बदलली आहे. त्यामागे एकमेव कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, असं अनुराग म्हणाला आहे. तो एका मुलाखतीमध्ये बोलत होता.

सरकार सध्या लोकांचं लक्ष खऱ्या मुद्द्यांवरुन हटवून बॉलिवूडवर केंद्रित करत आहे. मी काँग्रेस समर्थक नसून सध्याचं सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे त्याच्या विरोधात आहे, असं मत अनुराग कश्यपने व्यक्त केलं.

मी उद्धव ठाकरे यांच्या मतांशी सहमत नसेलही, पण मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं, असं अनुराग कश्यपने म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

सरदार तारासिंग यांच्या निधनाने एक सच्चा समाजसेवक हरपला- देवेंद्र फडणवीस

राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण; स्वतः ट्विट करुन दिली माहिती

IPL2020- नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जची प्रथम गोलंदाजी

“पहाटेचा शपथविधी यशस्वी न होणं हीच फडणवीसांची खंत”

बायको दारू पिऊन मारहाण करते, पतीची पोलिसांत धाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More