बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुबारक हो टुकडे टुकडे भाजप– अनुराग कश्यप

नवी दिल्ली | नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान एका तरुणाने गोळीबार केल्याची घटना दिल्लीत घडली. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने पंतप्रधान मोदी आणि अमित शहांंवर टीकास्त्र सोडलं आहे. याबाबत त्यानं ट्विट केलं आहे.

आश्चर्याची गोष्ट आहे सर्व हिंदूत्ववादी दहशतवाद्यांना वाटते की ते देशभक्त आहेत. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपने गेल्या सहा वर्षात हे साध्य करुन दाखवले. अभिनंदन तुकडे तुकडे भाजप, असं म्हणत अनुरागने पंतप्रधान मोदी आणि शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

जय श्रीराम व भारत माता की जय म्हणा आणि हिंदूत्वाच्या नावाखाली वाट्टेल ते करा. तुम्हाला थांबवणारं कोणी नाही. कारण आता असा संशय येतोय की सरकारच दहशदवादाला पाठिंबा देत आहे, असं ट्विट करत अनुरागने भाजपवर टीका केली आहे.

दरम्यान, अनुरागचे हे दोन्ही ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. काही लोक अनुरागच्या ट्विटचं समर्थन करत आहेत. तर काहीजण त्याच्यावर टीका देखील करत आहेत.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

…अन फडणवीस म्हणाले तुम्ही पैलवान आहात मी नाही

आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

महत्वाच्या बातम्या-

राज्यात नव्या 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार? अजित पवार म्हणाले…

कोणाच्या अन्नात विष कालवणे हे आमचे संस्कार नाहीत- येवले चहा

मुस्लिमांशी खेळाल तर मोदींना पुन्हा चहा विकावा लागेल- इम्तियाज जलील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More