बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘IFFLA’मध्ये मराठमोळ्या अक्षय इंडीकरची मुलाखत घेणार अनुराग कश्यप!

मुंबई | अक्षय इंडीकर हे नाव चित्रपट सृष्टीसह सिनेरसिकांना आता चांगलंच परिचित झालं आहेत. त्याची मराठीतील पहिली डॉक्यु-फिक्शन फिल्म ‘उदाहरणार्थ नेमाडे’ असो किंवा ‘त्रिज्या’ तसेच ‘स्थलपुराण’सारखे दर्जेदार चित्रपट असोत. अक्षयच्या या चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्यंत नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये विविध पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. यामध्ये आता आणखी एका सन्मानाची भर पडली आहे.

मूळच्या सोलापूरमधील अक्षयने चित्रपटसृष्टीतील पदार्पणातच आंतरराष्ट्रीय मंच गाजवला आहे. आता अक्षयचा ‘स्थलपुराण’ हा चित्रपट मे महिन्यात लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ‘लॉस एंजेलिस इंडियन फिल्म फेस्टिवल’मध्ये ‘क्लोजिंग फिल्म’ म्हणून दाखवला जाणार आहे. या फेस्टिवलला जगभरातील नामांकित दिग्दर्शक, निर्माते कलाकार, तंत्रज्ञ, समीक्षक उपस्थित असतात. खासकरून हॉलिवूडमधील अनेक मोठ्या हस्ती यामध्ये सहभागी होतात. अक्षयचा ‘स्थलपुराण’ तिथे दाखवला जाणार असल्याने मराठी चित्रपट हा आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार आहे.

इतकेच नव्हे तर या फेस्टिवलनंतर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप हे स्वतः अक्षय इंडीकरची मुलाखत घेऊन त्याचा आतापर्यंचा प्रवास उलगडवणार आहेत. यामुळे अक्षयला मिळालेला हा बहुमान ही मराठी सिनेसृष्टीसाठीच नव्हे तर अवघ्या भारतीय सिनेजगतासाठी अभिमानाची बाब आहे. अनेक संघर्षातून घडून आता इतर धडपड्या कलाकार, दिग्दर्शकांना नेहमीच मदत करणारे दिग्दर्शक अनुराग कश्यप हे स्वतः अक्षयची मुलाखत घेत असल्याने हे मराठी चित्रपट आणि एकूणच तरुण दिग्दर्शक यांच्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

दरम्यान, ‘उदाहरणार्थ नेमाडे’ या वेगळ्या धाटणीच्या डॉक्यु-फिक्शन फिल्मपासून आपल्या चित्रपट कारकीर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात करणारा अक्षय इंडीकर, आपल्या स्वतंत्र आणि अनोख्या चित्रपट शैलीमुळे जगभरात नावाजला गेला आहे. आशिया खंडाचा अकॅडमी अवॉर्ड अशी ख्याती असलेला ‘यंग सिनेमा अवॉर्ड’ हा पुरस्कार देखील अक्षयला मिळालेला आहे. त्यातच आता ‘लॉस एंजेलिस इंडियन फिल्म फेस्टिवल’मध्ये अक्षयच्या फिल्मचा समावेश झाल्याने अक्षयच्या आणि एकंदरीत मराठी सिनेमाच्या सन्मानात भर पडली आहे.

थोडक्यात बातम्या-

यंत्रणांवर ताण आहे, हे मान्य पण म्हणून या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही- राज ठाकरे

अत्यावश्यक सेवेतील सर्वांना मोफत सेवा देणाऱ्या रिक्षाचालकाचं रोहित पवारांकडून कौतुक, म्हणाले…

आता ऑक्सिजनचा प्रश्न सुटणार?; ‘या’ बड्या कंपनीनं दिली मोठी ऑफर

पोटावर झोपल्यानं खरंच ॲाक्सिजनची पातळी वाढते का?; जाणून घ्या काय खरं

‘विरारमधील घटना ही काही नॅशनल न्यूज नाही’; राजेश टोपेंचं धक्कादायक वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More