नवी दिल्ली | वस्तू व सेवा कराची रक्कम दोन टप्यात सर्व राज्यांना देण्याच येणार असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत सांगितलं. गेल्या चार महिन्यांत केंद्र सरकारने राज्यांना त्यांच्या भरपाईची रक्कम दिलेली नाही. ती लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी सर्व राज्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
वास्तविक दोन महिन्यांची रक्कम एकत्रित देण्याची आतापर्यंत पद्धत आहे. जीएसटी कायद्यानुसार भरपाईची ही रक्कम केंद्राने प्रत्येक राज्याला द्यायची असते. त्यानुसार जुलै 2017 पासून राज्यांना ही भरपाईची रक्कम दिली जात असल्याचं अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे.
जुलै 2017 पासून सर्व राज्ये तसेच दिल्ली व पुडुच्चेरी या दोन केंद्रशासित प्रदेशांना मिळून 2 लाख 10 हजार 969 कोटी रुपये इतकी भरपाईची रक्कम केंद्र सरकारने दिली असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, सप्टेंबर 2019 पर्यंतची सर्व रक्कम राज्यांना देण्यात आली आहे. आता केवळ ऑक्टोंबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांनी रक्कम देणं बाकी आहे. ती रक्कम दोन टप्प्यांत देण्यात येणार सांगण्यात आलं असलं तरी प्रत्यक्षात नोव्हेंबर हे डिसेंबर हे दोन महिनेही संपले आहेत, हा मुद्दा प्रश्नोत्तराच्या तासात चर्चेलाच आला नाही.
ट्रेंडिंग बातम्या-
…तर मुख्यमंत्र्यांना जनता माफ करणार नाही- देवेंद्र फडणवीस
दिल्लीचा गड जिंकण्यासाठी प्रचाराला बीडची टीम
महत्वाच्या बातम्या-
अरविंद केजरीवाल दहशतवादी, आमच्याकडे पुरावे आहेत- प्रकाश जावडेकर
भाजपला शह देण्यासाठी महाविकास आघाडीचा प्लॅन ठरला!
मुनगंटीवारांचं सेनेला अजूनही ‘प्रपोजल’; गाण्यातून सांगितलं, शिवसेना आमचीच…!
Comments are closed.