बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी समर्थकाची अनुरागच्या मुलीला बलात्काराची धमकी; अनुरागचा मोदींना सवाल

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकामध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. यावर दिग्दर्शक अनुराग कश्यप याने मोदींचे आभार मानले आहे. तसेच त्याने मोदींना एक सवालही केला आहे.

तुम्ही सर्वसमावेशकतेचा संदेश दिलात. पण तुमचे समर्थक माझ्या मुलीला बलात्काराची धमकी देत आपला आनंदोत्सव साजरा करत आहेत, त्यांना कशाप्रकारे तोंड द्यायचं, असा सवाल त्यांनी केला आहे.

अनुराग यांनी धमकी दिलेल्या व्यक्तीची पोस्ट शेअर केली आहे. तुझ्या बापाला शांत राहायला सांग अशी धमकी त्या व्यक्तीने अनुरागच्या मुलीला दिली आहे.

दरम्यान, अनुराग कश्यपने अनेकदा मोदींवर टीका केली आहे. मात्र त्याच्या मुलीला बलात्काराची धमकी मिळाल्याने त्याने चिंता व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

-मुहूर्त ठरला!!! या दिवशी नरेंद्र मोदी घेणार पंतप्रधानपदाची शपथ

-सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर शब्दफुलांचा वर्षाव

-प्रचारातली जुगलबंदी विसरुन शिवतारेंनी दाखवला दिलदारपणा!

-शिवसेनेच्या संभाव्य 4 केंद्रीय मंत्र्यांचा दारुण पराभव

-मनोरंजन आणि क्रिडा क्षेत्रातील भाजपचे ‘हे’ उमेदवार झाले विजयी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More