बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

WTC च्या फाईनलची तयारी करणाऱ्या विराटबद्दल अनुष्कानं भन्नाट कॅप्शन देत पोस्ट केला ‘हा’ फोटो

नवी दिल्ली | टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी साउथम्पटनमध्ये आहे. विराटसोबत त्याची बायको अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका देखील आहे. अनुष्कानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत विराटबद्दल एक मजेशीर पोस्ट लिहिली आहे.

अनुष्कानं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. साउथम्पटनमधला हा फोटो असून त्याला तिने एक भन्नाट कॅप्शन दिलं आहे. ‘काम घरी आणू नये, ही गोष्ट सध्या विराटसाठी लागू नाही’ असं अनुष्कानं या फोटोखाली लिहलं आहे.

टीम इंडिया 3 जूनला इंग्लंडला दाखल झाली आहे. सर्व खेळाडूंना 3 दिवस आयसोलेशनमध्ये राहावं लागणार आहे. त्यानंतरच छोटे गट पाडून सराव करता येईल. न्यूझीलंडला पराभूत करण्याच्या उद्देशानं इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंनी तिसऱ्या दिवशीच सरावाला सुरूवात केली आहे.

दरम्यान, टीम इंडियाच्या खेळाडूंनी शनिवारी वेगवेगळ्या वेळी जिम आणि मुख्य मैदानात ट्रेनिंग सुरू केली. इंग्लंडच्या साउथम्पटनमध्ये असलेल्या स्टेडियममध्येच हॉटेल आहे आणि टीम इंडियाचे खेळाडूही याच हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना आयसोलेशनच्या कालावधीमध्येही सराव करण्याची परवानगी मिळाली आहे. 12 जूनला टीमचा क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर सरावाला सुरुवात होईल. 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. तर 23 जून हा रिझर्व डे असल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

 

थोडक्यात बातम्या –

‘या’ जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रूग्णांना आवश्यक असलेल्या इंजेक्शनसाठी रुग्णालयाला द्यावं लागणार हमीपत्र

खुर्ची हे माझं स्वप्न नव्हतं, पण पुत्रकर्तव्य म्हणून मी खुर्चीवर आहे- उद्धव ठाकरे

डान्स इंडिया डान्स फेम ‘या’ कलाकाराचा गंभीर अपघात; देतोय मृत्यूशी झुंज

सरसकट 9 ते 6 दुकानं उघडायला परवानगी द्या अन्यथा…

पुणेकरांनो विनाकारण गर्दी करू नका, अन्यथा…- अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More