बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनुष्का शर्माला आवडली हिरव्या वाटाण्याची भाजी अन् आळूची वडी; फोटो शेअर करत म्हणाली…

मुंबई | अनुष्का शर्मा सध्या आपल्या कुटुंबासह मुंबईत आयपीएल निमित्तानं उपस्थित आहे. आयपीएलचे सामने महाराष्ट्रात असल्यानं सहाजिकच मराठी जेवणाचा आस्वाद घेतला जाणार. अनुष्का सोशल मीडियावर देखील जास्त सक्रिय असते. अशातच अनुष्का शर्मानं जेवणाच्या ताटाची स्टोरी ठेवली आहे, ती सध्या जास्त चर्चेत आहे.

अनुष्काने जेवणाच्या ताटाचा शेअर केलेला फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. अनुष्का केळीच्या पानावर दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घेतला. अनुष्काच्या ताटात महाराष्ट्रातील प्रसिद्ध पदार्थ दिसत आहेत. परिणामी अनुष्काच्या या फोटोला व्हायरल केलं जात आहे.

मसाला भात, वरण भात, वाटाण्याची भाजी, लोंचं, अशाप्रकारचे पदार्थ दिसत आहेत. अनुष्कानं फोटो शेअर करताना जेवणाची वेळ झाली असं कॅप्शन दिलं आहे. तर मराठी पंगतला टॅग केलं आहे. अनुष्कानं याअगोदरही अनेकदा महाराष्ट्रीयन जेवणाचे फोटो शेअर केले आहेत.

दरम्यान, आयपीएल सुरू असल्यानं भारतातील आणि परदेशातील सर्व खेळाडू मुंबई आणि आसपासच्या शहरात आहेत. परिणामी महाराष्ट्रातील जेवणाचे फोटो मोठ्या संख्येनं शेअर केले जात आहेत.

थोडक्यात बातम्या – 

ईडीच्या कारवाईने दिल्लीत गोंधळ; काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याची चौकशी सुरू

राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

देशातील कोरोना रूग्णांबाबत ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

“मातोश्रीत बसून सत्ताफळं खाणाऱ्यांनी लाखालाखांच्या जाहीर सभा घेऊन दाखवाव्यात”

महाराष्ट्रातील ‘या’ भागात अवकाळी पाऊस कोसळणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More