बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रेग्नसीनंतर ‘या’ आजारामुळे अनुष्का शर्माने कापले केस

मुंबई | नेहमीच चर्चेत असणारी जोडी म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली त्यांच्या बाळामुळे सतत प्रचंड चर्चेत आहेत. अशातच आता अनुष्काच्या नवीन हेअरकटमुळे ती पुन्हा लोकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. याबाबत बोलताना अनुष्काने तिला झालेल्या आजाराबद्दल देखील सांगितलं आहे.

शुक्रवारी इन्स्टाग्रामवर अनुष्काने एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिनं आपलं दुःख व्यक्त केलं आहे. तिनं लिहिलं की, बाळाला जन्म दिल्यानंतर केसांची गळती वाढल्यामुळे मी एक चांगला हेअरकट करून घेतला आणि तुम्ही सगळ्यांनी माझं कौतुक केलं. यासाठी तिने जॉर्ज नॉर्थवुड यांचे आभार व्यक्त केले आहेत. तुम्ही खरंच खूप शानदार आहात, असं देखील तिने म्हटलं आहे.

याबाबत बोलताना अनुष्काने जॉर्ज नॉर्थवुडशी संपर्क करून देण्यासाठी सोनम कपूरलाही थॅक्स असं म्हटलं आहे. अनुष्का शर्मा सध्या आपल्या बाळासह आनंदाचे क्षण घालवत आहे. सध्या ती  विराट सोबत लंडनमध्ये राहत आहे. अनुष्का शर्माने प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली सोबत काही वर्षांपुर्वी लग्न गाठ बांधली होती.

दरम्यान, अनुष्का तिच्या इन्स्टाग्रामवर जास्त सक्रीय नसते. मात्र तिच्या आयुष्यातल्या महत्वाच्या क्षणांची ती चाहत्यांना माहिती देत असते. यामुळे तिने तिच्या हेअरकट बद्दल देखील पोस्ट शेअर केली आणि लोक आता भरभरुन स्तुती करत आहेत. ती या हेअरकटमुळे अत्यंत सुंदर दिसत आहे, अश्या अनेक कमेंट्स तिच्या पोस्टवर करण्यात आल्या आहेत.

पाहा फोटो :

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

थोडक्यात बातम्या-

तीन पक्षांमध्ये मतभेद नाहीत, सरकार पाच वर्ष टिकणार- शरद पवार

औरंगाबाद हळहळलं; शस्त्रक्रीया करताना डाॅक्टरला ह्रदयविकाराचा झटका

मलायका अन् अर्जुनचा फोटो शेअर करत ‘या’ अभिनेत्याने सलमान खानला डिवचलं

“सत्तेत आल्याशिवाय मी काहीच करणार नाही, महाराष्ट्रासाठी काहीच देणार नाही”

नरेंद्र मोदींविरोधात बोलल्याने योगी सरकारने महसूल अधिकाऱ्याला केलं निलंबित!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More