नवी दिल्ली | ‘सेफ ड्रायव्हिंग’ला प्रोत्साहन देण्यासाठी दिल्ली ट्रॅफिक पोलिस एक कॅम्पेन राबवत आहे. ज्या अंतर्गत एक व्हिडीओ सीरिज सुरू करण्यात आली असून त्यासाठी आता अनुष्का शर्मा आणि वरुण धवनची मदत मागण्यात आली आहे.
अनुष्का शर्माने एक व्हिडीओ शेअर केला आहे त्यात ती ‘सेफ ड्रायव्हिंग’साठी आवाहन करताना दिसत आहे. ट्रॅफिक पोलिस नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना राबवत आहेत या बद्दलची माहिती तिने या व्हिडीओतून दिली आहे.
लवकरच वरुण धवनचाही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जाईल. याआधी अर्जुन कपूर, कंगना राणावत, सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा आणि कपिल शर्मा हे देखील या कॅम्पेनमध्ये सहभागी झाले होते.
— Delhi Traffic Police (@dtptraffic) April 2, 2018
महत्तवाच्या बातम्या-
- …म्हणून पवारांना वाकून नमस्कार केला; एकनाथ खडसेंचा खुलासा
- फेक न्युजबाबतचा निर्णय मागे, आता पत्रकारांवर होणार नाही कारवाई
- शिवसेनेची वृत्ती गांडुळासारखी आणि भाजप उंदरांसोबत खेळण्यात व्यस्त!
Comments are closed.