बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गरोदरपणातील कपड्यांची अनुष्का शर्मा करणार विक्री

मुंबई | प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या गरोदरपणात तसेच आता बाळाच्या जन्मानंतर सतत चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी अनुष्काच्या नवीन हेअरस्टाईलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अशातच आता अनुष्काने केलेल्या नवीन घोषणेने सर्वांचं पुन्हा एकच लक्ष वेधून घेतलं आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांना जानेवारी 2021 मध्ये मुलगी झाली. मुलीचं नाव वामिका असं ठेवण्यात आलं आहे. गर्भारपणात असताना वापरलेले कपडे काही महिन्यांसाठीच वापरले जातात. पुन्हा ते वापरण्याची वेळ सध्याच्या काळात क्वचितच येते.

याबाबत बोलताना ‘भारतातल्या शहरी भागातल्या अगदी एक टक्का गर्भवती महिलांनीही नव्या कपड्यांऐवजी वापरलेले कपडे विकत घेतले, तरीही एका माणसाला 200 वर्षांत प्यायला जेवढं पाणी लागेल, तेवढं पाणी दर वर्षी वाचवलं जाऊ शकतं. शेअरिंग या कल्पनेवर माझा दृढ विश्वास आहे. म्हणूनच आता माझ्या गर्भारपणातले कपडे आता कोण घेतंय, हे पाहण्याची मला उत्सुकता आहे, असं अनुष्का शर्माने म्हटलं आहे.

दरम्यान, अनुष्काचे हे कपडे Dolce Vee या सोशल एंटरप्राइजच्या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्या कपड्यांच्या विक्रीतून आलेली रक्कम ‘स्नेहा’  प्रकल्पांतर्गत माता आरोग्यासाठी वापरली जाणार आहे.

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)


थोडक्यात बातम्या- 

‘कर्मचाऱ्यांनो लसीचे दोन डोस घ्या अन्यथा…’; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी दिला इशारा

सर्वांची आवडती ‘ही’ अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई, स्वतःच दिली गुडन्यूज

निर्वासित मजुरांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; 31 जुलैपर्यंत ‘वन नेशन वन रेशन’ योजना लागू करा!

इस्ज्ञायल दूतावासाने मराठीतून ट्वीट करत ‘या’साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं केलं अभिनंदन

आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील 3 चिमुकल्यांनी केली डेल्टा प्लस विषाणूवर मात

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More