बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनुष्का शर्माच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे शुटींगवर परतल्यानंतर ती होतेय ट्रोल

मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली सोबत काही वर्षांपुर्वी लग्न गाठ बांधली. त्यानंतर ते दोघेही आता आई वडिलांच्या भुमिकेत आले आहेत. 11 जानेवारीला अनुष्काने मुलीला जन्म दिला आहे. त्यानंतर अनुष्काने दोन महिन्यांचा ब्रेक घेतला आणि आता ती पुन्हा कामावर परतली आहे. मात्र ती कामावर परतताच अनेक चाहत्यांकडून तसेच नेटकऱ्यांकडून ट्रोल होऊ लागली आहे.

लग्नाच्या आधी एका कार्यक्रमामध्ये अनुष्का शर्माची मुलाखत घेण्यात आली होती. ही मुलाखत सिमी गरेवालने घेतली होती. या मुलाखतीत सिमीने अनुष्काला अनेक प्रश्न विचारले होते. यादरम्यान सिमीने अनुष्काला लग्न म्हत्वाचं आहे का? असा प्रश्न विचारला होता. यावर अनुष्काने तिला लग्न म्हत्वाचं असून तिला लग्न करुन मुल देखील हवं असल्याचं सांगितलं होतं.

या मुलाखती दरम्यान अनुष्काने तिचं लग्न होऊन मुल झाल्यानंतर काम न करण्याची शक्यता दर्शवली होती. मात्र जानेवारीमध्ये मुल होताच दोन महिन्यानंतरच अनुष्का कामावर परतली असल्यामुळे तिच्या चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी गडे मुडदे उकरून काढत या व्हिडीओवरुन तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केला आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ अनुष्काच्या लग्नाच्या खूप आधीचा आहे. मात्र त्यामध्ये केलेल्या वक्तव्यामुळे अनुष्कावर आता अनेक सवाल करण्यात आले आहेत. तसेच तिला अनेक सल्ले देखील देण्यात आले आहे. आता यावर अनुष्का तिची प्रतिक्रीया देईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

 

थोडक्यात बातम्या-

“भाजपने संपूर्ण ताकद लावली तरी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल”

कोहलीच अव्वल! एकदिवसीय सामन्यात विराटची रँकिंग नंबर 1

‘मी बोरिस जॉन्सन यांच्यासोबत अनेकदा शरीरसंबंध ठेवलेत’; ब्रिटनच्या पंतप्रधानांबाबत महिलेचा मोठा गौप्यस्फोट

‘हा केवळ अर्थमंत्र्यांचा प्रॉब्लेम आहे, की…’; सुब्रमण्यम स्वामी मोदी सरकारवर बरसले

बेड मिळत नसल्याने ॲाक्सिजन सिलेंडरसह आंदोलन केलेल्या रुग्णांचा मृत्यू

सह्याद्रीतील नव्या वनस्पतीला शरद पवार यांचे नाव!

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More