Anushka Shetty | साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शेट्टीबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. अनुष्काच्या आरोग्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आलीये. यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने स्वतःला असलेल्या दुर्मिळ आजाराबद्दल खुलासा केला आहे.
अनुष्का शेट्टीला न्यूरो डिसऑर्डर हा एक दुर्मिळ आजार झाला आहे. यबाबत तिने स्वतःच मोठा खुलासा केलाय. ‘मला हसण्याचा आजार आहे. तुम्हाला जाणून धक्का बसेल. माझ्या केसमध्ये हसणं आजार आहे. एकदा मी हसणं सुरु केलं तर, मला स्वतःला देखील हसणं थांबवता येत नाही.’, असं अनुष्का म्हणाली आहे.
अनुष्का शेट्टीला झालाय ‘हा’ दुर्मिळ आजार
इतकंच नाही तर, बऱ्याचवेळा अनुष्का 15 ते 20 मिनिटं मोठ-मोठ्याने हसते. विनोदी सीन शूट करत असताना ती हसत-हसत जमीनीवर लोळते. ज्यामुळे अनेकदा सिनेमाचं शुटिंग देखील थांबवण्यात आलं असल्याचं अनुष्काने (Anushka Shetty) सांगितलंय.
अनुष्काच्या या अजीब आजारामुळे चाहते तिच्याबद्दल काळजी व्यक्त करत आहेत. अनुष्काने दिलेल्या माहितीनुसार तिला Pseudobulbar Affect हा आजार झालाय. हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. या अवस्थेत व्यक्ती एकतर जोरात हसायला लागते किंवा रडायला लागते.
अनुष्का शेट्टीने केला खुलासा
या आजाराचा थेट संबंध हा मेंदूशी असतो. अनुष्काला हा आजार झाल्याचं कळताच त्याची जोरदार चर्चा झाली. तिला हा आजार कसं काय झाला आणि ती यावर काय उपचार घेतेय, याबाबत तरी सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
अनुष्काच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास ती ‘मिस शेट्टी मिस्टर पॉलीशेट्टी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. आता अनुष्का आगामी सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.अनुष्काने ‘बाहुबली’ सिनेमात साकारलेली देवसेनाची भूमिका खूप गाजली होती. या चित्रपटापासून तिचा चाहता वर्ग अजून मोठा झाला. आता अनुष्का (Anushka Shetty) तिच्या या आजारामुळे चर्चेत आली आहे.
News Title – Anushka Shetty Suffering Rare Laughing Disease
महत्त्वाच्या बातम्या-
“हनिमूनच्या रात्री नवऱ्याने मित्राबरोबर माझा लिलाव..”; करिश्मा कपूरचा धक्कादायक खुलासा
निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ; पाहा Video
“..तर कंगनाला राष्ट्रपती भवनातच ठेवायला हवं”; संजय राऊतांचा टोला
अजितदादांच्या आमदारांना पक्षात घेणार का? शरद पवारांना सवाल; उत्तर ऐकून चिंतेत पडालं