मुंबई | वास्तुविशारद आणि उद्योजक असलेल्या अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्यात यावा अशी मागणी रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी केली आहे. यासंदर्भातील याचिकाही गोस्वामी यांनी हायकोर्टात दाखल केली आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासह संपूर्ण प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणीही अर्णब गोस्वामी यांनी याचिकेद्वारे केली आहे.
अन्वय नाईक यांनी 5 मे 2018 रोजी अलिबाग येथील बंगल्यात आत्महत्या केली. अन्वयने लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क कंपनीचे नितेश सारडा यांची नावे लिहिली होती.
दरम्यान, अर्णबच्या घरावर छापा मारत रायगड पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना जामीन दिला.
महत्वाच्या बातम्या-
“…तर चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा”
‘…त्यामुळे जास्त उडू नकोस, मी कंगणा राणावत आहे’; शेतकरी आंदोलनावरुन कंगणा-दिलजीतमध्ये जुंपली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अबोल असले तरी चतुर आहेत- शरद पवार
कंगणा राणावतचं ट्विटर हँडल बंद करण्यात यावं यासाठी हायकोर्टात याचिका दाखल!
खळबळजनक! मुंबईत 2 लेकींची हत्या करून वडिलांनी संपवलं आयुष्य