बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर चिंता मिटली! Omicron बाबत दिलासादायक माहिती आली समोर

नवी दिल्ली | देशभरात पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. नव्याने आलेला व्हेरियंट ओमिक्रॉन (Omicron) वेगाने पसरत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सध्या केंद्र सरकार ओमिक्रॉनवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. अशा परिस्थितीत ओमिक्रॉन बाबत एक दिलासादायक बाब समोर आली आहे.

अमेरिकन औषध निर्माती कंपनी मॉडर्नाने याबाबत दावा केला आहे, की त्यांनी बनवलेला बुस्टर डोस हा आधीच्या दोन डोसपेक्षा ओमिक्रॉनवर अधिक प्रभावी आहे. त्यामुळे आता ओमिक्रॉनवर नियंत्रण मिळवण्यासाठी या बुस्टर डोसचा फायदा होऊ शकतो. मॉडर्नाच्या दाव्याने अनेक देशांना दिलासा मिळाला आहे.

मॉडर्नाने केलेल्या दाव्यानुसा, मॉडर्नाच्या यापूर्वीच्या दोन्ही डोसने ओमिक्रॉनविरोधात कमी प्रमाणात अँटीबॉडीज तयार केले. मात्र 50 मायक्रोग्रॅमच्या बुस्टर डोसने व्हेरीयंटच्या विरुद्ध 37 पट अधिक अँटीबॉडीज तयार केल्या. शिवाय 100 मायक्रोग्रॅमच्या बुस्टर डोसने अँटीबॉडीजची पातळी आणखी वाढवली आणि 83 पट अधिक अँटीबॉडीज तयार केल्या.

दरम्यान, भारतात लसीकरण झालेल्या लोकांपैकी 90% लोकांना ओमिक्राॅनच्या संसर्गाचा धोका आहे. अशी माहिती प्राथमिक संशोधनाच्या आधारे समोर आली आहे. फायझर आणि मॉडर्ना लस कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यास सक्षम आहेत. मात्र, यासाठी या लसींचा बुस्टर डोस द्यावा लागेल. मात्र या दोन्ही लस काही देशांमध्येच उपलब्ध नाहीत.

 

थोडक्यात बातम्या-

म्हाडाची परिक्षा ऑनलाईन पद्धतीनेच; पेपर फुटीनंतर नवी तारीख जाहीर

‘…कदाचित खूप उशीर झाला आहे’; Omicron बाबत धक्कादायक माहिती आली समोर

पेपर फुटी प्रकरणी ठाकरे सरकारची मोठी कारवाई; आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

जिवा शिवाची बैल जोड़! रावसाहेब दानवेंचा पत्नी आणि नातीसह बैलगाडीतून फेरफटका

‘हा’ बहुप्रतिक्षित IPO शेअर बाजारात धडकणार; गुंणतवणूकदांरांंना मोठी संधी

 

 

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More