चिंता वाढली! भारतात कोरोनाचे आणखी चार रूग्ण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

बिहार | चीनमध्ये कोरोनानं(Corona) पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळं जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच भारत सरकारनंही सतर्क होत भारतात कोरोनासंबधीत काही नियम लागू केले आहेत.

परंतु नुकतेच भारतातही कोरोनाचे रूग्ण(Corona Patients in India)आढळल्यानं चिंता वाढली आहे. बिहारमध्ये परदेशातून आलेले चार नागरिक कोरोना पाॅझिटीव्ह आढळले आहेत.

विमानतळावर जे चारजण पाॅझिटीव्ह आढळले आहेत. त्यातील तीनजण म्यानमारचे आहेत तर एकजण बॅंकाॅकचा आहे. परंतु या चौघांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळं त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

देशात कोरोनाची नियमावली पाळण्याचे आदेश पुन्हा एकदा सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यामुळं सर्वांनी योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे.

दरम्यान, केंद्र सरकारनं गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचे अवाहनही नागरिकांना केलं आहे. आपण सर्वांनीच नियमांचे पालन करून स्वत:ला आणि देशाला सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे.

महत्वाच्या बातम्या-