बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सेल्फीसाठी काहीही! आवडत्या अभिनेत्यासोबत फोटो काढण्यासाठी महिलेने मारले चक्क साडीतच पुशअप्स, पाहा व्हिडीओ

मुंबई | कलाकार आणि चाहते यांचं आगळंवेगळं नातं नेहमीच पाहायला मिळत असतं. आपल्या आवडत्या आणि लाडक्या कलाकारांसाठी चाहते काहीही करायला तयार असतात. अशीच काहीशी घटना देशातील पहिला पुरुष सुपर मॉडल म्हणून ओळखला जाणारा अभिनेता मिलिंद सोमण याच्यासोबत घडली आहे.

अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण कायम त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. फक्त मिलिंदचं नाही तर, त्याचं कुटुंबदेखील अत्यंत फिटनेस फ्रिक आहे. अशातच तो त्याच्या चाहत्यांनाही फिटनेस फ्रिक ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत फोटो काढण्याच्या पहिले 10 पुशअप्स मारण्याची अट ठेवतो. मात्र आता एका महिलेनं त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चक्क साडीतच पुशअप्स मारले.

काही दिवसांपूर्वी मिलिंदनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. मिलिंदनं कॅप्शनमध्ये, ‘सेल्फी घेण्यासाठी माझा आवडता पुशअप्स. मी एका बाजारात होतो. रायपूरमध्ये ज्याठिकाणी लोक चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत आहेत. तेथे या महिलेनं मला सेल्फीसाठी विचारलं. मी त्या महिलेला म्हणालो 10 पुशअप्स तेव्हा त्या महिलेनं कोणताही विचार न करता, मी माझ्या मोबाईलचा कॅमेरा ऑन करेपर्यंत 10 पुशअप्स पूर्ण केलं. ‘

दरम्यान, ‘ना साडीची चिंता आणि आजू-बाजूला असलेल्या लोकांची काळजी… त्या महिलेनं पुशअप्स पूर्ण केले. कधी-कधी तुम्हाला आनंदी जीवनासाठी सक्षम होण्याची फार गरज असते. फक्त तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी तुमच्यात फक्त हो बोलण्याची क्षमता लागते.’ असंही मिलिंदनं म्हटलं. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे.

पाहा व्हिडीओ – 

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्रात नवीन कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट, राज्याचा रिकव्हरी रेट 93.24 टक्यांवर

शाब्बास पुणेकर! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

आनंदाची बातमी! मुंबईतील नव्या कोरोनाबाधितांची संख्या हजारांच्या आत; कोरोनामुक्तीचा दर 94 टक्यांवर

काय सांगता! प्रियंकाच्या या संपुर्ण अवताराची रक्कम ऐकूण तुम्हालाही बसेल धक्का

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात लाॅकडाऊनमध्ये शिथिलता; आता शनिवार-रविवारीही दुकानं राहणार सुरू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More