प्रेयसीच्या आईसाठी त्यानं दान केली स्वतःची किडनी, तीनं दुसऱ्याशीच केलं लग्न
नवी दिल्ली | लोक प्रेमासाठी काय काय करतील याचा काही नेम नाही. प्रेमात लोक काहीही करु शकतात हे उगाच म्हटलं जात नाही. याची अनेक उदाहरणंही पहायला मिळतील. अशातच प्रेमात आंधळ्या झालेल्या एका तरुणाची बातमी समोर येत आहे.
प्रेमासाठी काहीही करायला तयार असलेल्या एका तरुणानं चक्क आपल्या प्रेयसीसाठी किडणी दान केल्याचा प्रकार घडला आहे. याविषयी स्वतः तरुणानं खुलासा केला आहे. तरुणानं म्हटलं की त्यानं आपल्या प्रेयसीच्या आईला आपली किडणी दान केली आहे.
या तरुणाचं नाव उजिएल आहे. उजिएल पुढे म्हणाला की, आपण किडणी दान केल्यानंतर महिन्याभरानं प्रेयसीनं त्याच्यासोबत ब्रेकअप केलं त्यानंतर प्रेयसीनं दुसऱ्यासोबत लग्न केलं. यामुळे त्याला मोठा धक्का बसला.
दरम्यान, तरुणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. अनेकांनी याला शेअरही केला होता. नेटकऱ्यांनी त्याला दुःखी न होण्याचा सल्ला दिला. मात्र आता या घटनेची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
थोडक्यात बातम्या –
रागाच्या भरात महिलेनं ऑनलाईन विकला पती, ‘या’ सवयीमुळे होती त्रस्त
वरुण धवनवर कोसळला दुःखाचा डोंगर; ‘या’ जवळच्या व्यक्तीचं झालं निधन
कोरोनाचा शेवट कधी होणार?; WHO च्या वक्तव्यानं टेंशन वाढलं
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन लावावं का?; WHOचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
पुढील 2 दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता
Comments are closed.