देश

निवडणुका जाहीर होईपर्यंत देशात काहीही घडू शकतं- नितीश कुमार

पाटणा | देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत काहीही घडू शकतं, असं सूचक वक्तव्य भाजपप्रणीत एनडीएतील संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये सीबीआय आणि पश्चिम बंगाल पोलीस यांच्यात झालेल्या वादावरुन त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

प. बंगालमध्ये जे झाले त्यावर सीबीआय आणि संबंधित सरकारचं काय ते स्पष्टीकरण देऊ शकतात. अशा गोष्टींवर मी प्रतिक्रिया देत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शारदा चिटफंड घोडाळ्याप्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या सीबीआय पथकाला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरुन हा वाद सुरू झाला होता.

महत्वाच्या बातम्या-

-पश्चिम बंगालमधील राजकीय युद्ध नव्या अराजकतेची ठिणगी- उद्धव ठाकरे

-“पूनमताई, प्रमोद महाजनांवर प्रविणने गोळ्या का झाडल्या हे सांगायला लावू नका”

… म्हणूनच भाजपचा हा सगळा डाव आहे- उद्धव ठाकरे

-राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद; चार युवक जिल्हाध्यक्षांचे राजीनामे

-जीव गेला तरी चालेल, पण तडजोड करणार नाही- ममता बॅनर्जी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या