Top News देश

घरात सुरक्षित ठिकाणी ठेवलेल्या पैशांसोबत असं काही घडलं, सारेच झालेत हैराण!

हैदराबाद |  आंध्रप्रदेशातील एका वराहपालन करणाऱ्या व्यापाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच्या घरात ठेवलेल्या पैश्यांसोबत घडलेला प्रकार पाहून सर्वांना धक्का बसला आहे. व्यापाऱ्याने बऱ्याच वेळेपासून आपल्या पुढच्या योजनांसाठी जमापुंजी एकत्र केली होती. बी. जमालैय्या या व्यापाऱ्याच्या स्वप्नांना अशा प्रकारे वाळवी लागेल, असा विचारही त्याने स्वप्नात केला नसेल.

वराहपालन करणाऱ्या बी. जमालैय्या यांनी घरात ठेवलेल्या पैश्यांना वाळवी लागून सगळी रक्कम नष्ट झाली आहे. वाळवीने पाच लाख रुपयांच्या नोटा फस्त केल्या आहेत. ही रक्कम एका लोखंडी पेटीत ठेवली होती. पेटी उघडल्यावर सर्व नोटांना छिद्रं पडली आहेत. बचत केलेल्या पैश्यांचं अशाप्रकारे नुकसान झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे.

वळवीने नोटा खाल्ल्याची घटना तशी दुर्मिळ आहे. घरात पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी लाकडी कपाट, लोखंडी तिजोऱ्यांचा वापर करतात. चोरीच्या घटना सामान्य आहेत पण वाळवीने केलेल्या या प्रकाराने व्यक्तीचं मोठं अर्थिक नुकसान झालं आहे.

आता डिजिटलायझेशनमुळे अर्थिक व्यवहार करणं सोयीचं झालं आहे. बॅंकेतही बचत खाते उघडून त्यात पैसे ठेवले जातात. तरीही काही लोक राेख रक्कम अडीअडचणीसाठी घरात ठेवतात. या प्रकाराची दखल घेऊन पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. माहितीनूसार बी. जमालैय्या यांचे कोणत्याही बॅंकेत अकाउंट नव्हते.

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; ‘या’ व्यक्तीला घेतलं ताब्यात

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

‘मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आणखी किती वर्षे टोल वसुली करणार?’; उच्च न्यायालयाने सरकारला सुनावलं

राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार वाद पुन्हा पेटण्याची शक्यता; पाहा काय आहे प्रकरण

आरोग्यमंत्र्यांच्या आवाजातील ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल, राजेश टोपे म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या