बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उपमुख्यमंत्र्यांचा टिकटॉक व्हिडीओ व्हायरल!

मुंबई | हल्ली टिकटॉक अ‌ॅपच्या माध्यमातून व्हिडीओ बनवण्याचं प्रत्येकाला जणू व्यसनच लागलं आहे. आंध्रप्रदेशच्या उपमुख्यमंत्री पामुला पुष्पा श्रीवानी यांना देखील आपला टिकटॉक करण्याचा मोह आवरला नाही. श्रीवानी यांचा टिकटॉक व्हिडीओ हा सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

श्रीवानी या आंध्रप्रदेशच्या आदिवासी मंत्री आहेत. त्या उत्तर आंध्रप्रदेशमधील विखाखापट्टनम जवळील कुरूपम मतदारसंघातील आमदार आहेत. सध्या विशाखापट्टनमला आंध्रपदेशची प्रशासकीय राजधानी करण्याचा विचार आहे.

जगन मोहन रेड्डी यांनी घेतलेल्या निर्णयाचं कौतुक करतानाचा श्रीवानी यांचा हा टिकटॉक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होत आहे. या व्हिडीओमध्ये ‘रयालासीमा मुद्दुबिना मना’ हे गाण वाजत आहे. जगमोहन रेड्डी यांचं मूळ गाव ‘रयालासीमा’ आहे.

दरम्यान, अवघ्या काही दिवसात ‘टिकटाॅक’ या ‌अ‌ॅपने भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घातला आहे.  2018 या एकाच वर्षात टिकटॉकने तब्बल 12 अब्ज  डाॅलर्सचा गल्ला जमावला आहे. सद्यस्थितीत टिकटॉकचे 500 दशलक्ष वापरकर्ते आहेत.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More