Top News मुंबई

वक्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचं निधन

Loading...

मुंबई | सामाजिक कार्यकर्त्या आणि वक्त्या ॲड. अपर्णा अरूण रामतीर्थकर यांचं वयाच्या 65व्या वर्षी अर्धांगवायुच्या आजाराने मंगळवारी दुपारी सोलापुरमध्ये निधन झालं. त्यांनी सोलापूरमध्ये अखेरचा श्वास घेतला.

हिंदुत्व विचारसरणीचा पगडा असलेल्या अपर्णा रामतीर्थकर यांनी सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदाऱ्या’ यासारख्या विषयांवर तीन हजारांहून अधिक व्याख्याने दिली होती. तुटणारी घरे वाचविली पाहिजेत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ‘पाखर संकुल’, ‘उद्योगवर्धिनी’ आदी संस्थांशी त्यांचा संबंध होता.

अपर्णा ताईंचं व्याख्याण विशेषत: मुलींचे  शिक्षण, त्यांचं समाजात फिरणं, त्याची कपडे अशा अनेक मुद्यांवरून त्यांच्यावर झाली होती. मूळच्या पुण्याच्या असलेल्या अपर्णा रामतीर्थकर सोलापुरात आपले दिवंगत पती तथा ज्येष्ठ पत्रकार अरूण रामतीर्थकर यांच्याबरोबर आल्या आणि सोलापूरकर झाल्या. त्या उत्तम हौशी नाट्य कलावंत होत्या.

दरम्यान, अपर्णा रामतीर्थकर यांच्या  पश्चात आई, मुलगा आशुतोष, सून रश्मी आणि नातू असा परिवार आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्र्यांकडे महाराष्ट्र मोठा भाऊ म्हणून पाहतोय- सुप्रिया सुळे

अर्थकारण महापालिकेतल्या टक्केवारी इतके सोप्प नाही; शिवसेनेच्या टीकेला भाजप आमदाराकडून प्रत्युत्तर

महत्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांच्या बांधावर बी-बियाणे आणि खतं पोहचवा; कृषीमंत्र्यांचे आदेश

आजपासून आणखी 5 ठिकाणी कोरोना निदान प्रयोगशाळा

राज्य सरकारचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या