बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ सचिन वाझे 16 वर्षांनंतर पुन्हा पोलिसात दाखल, इथं आहे नेमणूक!

मुंबई |  गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांची 16 वर्षांनंतर पुन्हा पोलिस दलात एन्ट्री झाली आहे. पहिल्यांदा सशस्त्र पोलिस दलात असणारे वाझे आता गुन्हे शाखेत काम करणार आहेत.

मुंबईतल्या घाटकोपर इथे बस स्टॉपजवळ एक बॉम्बब्लास्ट झाला होता. या प्रकरणातील आरोपी ख्वाजा युनिस जेलमध्ये असताना त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिस दलातील काही पोलिसांवर त्याची हत्या केल्याचा तसंच पुरावे नाहीसे करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्याच प्रकरणी त्यांना 2004 साली निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं होतं.

ख्वाजा युनिस हत्येच्या आरोपाप्रकरणी तपास सुरू असताना 2007 साली त्यांनी राजीनामा दिला होता. मात्र त्यांचा राजीनामा त्यावेळी मंजूर करण्यात आला नव्हता. आता 16 वर्षांनंतर पुन्हा एकदा वाझे पोलिस दलात सक्रिय होणार आहेत. वाझे पोलिस दलातील एक हिमतीचे आणि बुद्धिवान अधिकारी प्रसिद्ध आहेत.

दरम्यान, सचिन वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत जवळपास 60 एन्काऊंटर केले आहेत. त्यांचा मध्यतंरीच्या काळात शिवसेनेशी जवळून संबंध आला होता. 2008 त्या दसरा मेळाव्यात ते सहभागी देखील झाले होते.

ट्रेंडिंग बातम्या-

….म्हणून मला शिवभक्तांचा सार्थ अभिमान, त्यांच्या समोर मी नतमस्तक- छत्रपती संभाजीराजे

काँग्रेसचं ठरलं… कोरोनासोबत जगायचं! कार्यालयीन कामकाज पुन्हा सुरु पण लोकांना प्रवेशासाठी ‘ही’ अट

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस चाललीये; राजनाथ सिंह महाविकास आघाडीवर बरसले

कोकणच्या मदतीला भाजपा, 14 ट्रक मदतसामुग्री रवाना- देवेंद्र फडणवीस

‘कोरोनाबरोबर राहण्याची तयारी ठेवावी लागेल; खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा खास कानमंत्र…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More