बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माफी मागून, 25 कोटींची भरपाई द्या’, शिल्पा शेट्टीची माध्यमांविरोधात हायकोर्टात धाव

मुंबई | अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्रा सध्या अश्लील व्हिडीओ प्रकरणी चांगलाच अडकला आहे. राज कुंद्राच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली असून त्याचा जामीन अर्जही कोर्टानं फेटाळला होता. या प्रकरणामुळे शिल्पालाही खूप ताण सहन करावा लागत आहे. अशातच आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं माध्यमांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिल्पा आणि पती राज कुंद्रा या दोघांच्याही विरोधात माध्यमांनी वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. शिल्पानं माध्यमांवर खोट्या बातम्या करण्याच्या आणि आपली प्रतिमा खराब करण्याचा आरोप केला आहे. शिल्पानं 29 माध्यमांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यात काही पत्रकारांचाही समावेश आहे. 

ज्या माध्यमांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे त्या माध्यमांनी माफी मागावी आणि 25 कोटींची भरपाई द्यावी, अशी मागणी शिल्पानं केली आहे. त्यामुळे याप्रकरणी काय निर्णय घेण्यात येईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, राज कुंद्राप्रकरण समोर आल्यापासून अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे. अनेक लोकं समोर येऊन याप्रकरणी आपलं मत व्यक्त करत आहे. आत्तापर्यंत अनेक गोष्टी समोर आल्या असून पोलीस याप्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

थोडक्यात बातम्या –

धक्कादायक! महिला डाॅक्टरला तब्बल तीन वेळा झाली कोरोनाची लागण

‘तुम्ही कसल्या कायदा सुव्यवस्थेच्या गप्पा मारताय?’; संजय राऊत आक्रमक

बाॅक्सिंगमध्ये भारताचं पदक निश्चित; लवलीना बोर्गोहेनची दमदार कामगिरी

“ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर….”

पुणेकरांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपासून सुरु होऊ शकते मेट्रो

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More