पुणे महाराष्ट्र

“शरद पवारांना आम्ही बजरंग बली हनुमानाच्या ठिकाणी मानतो”

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना आम्ही बजरंग बली हनुमानाच्या ठिकाणी मानतो. ते आमचे दैवत आहेत. केंद्र सरकारने त्यांचं संरक्षण काढून त्यांचा अपमान केला असल्याचं 1978 चे महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम यांनी म्हटलं आहे.

शरद पवार आमचे आधारस्तंभ आहेत. केंद्र सरकाराने त्यांची सुरक्षा काढून घेतली तर आम्ही दिल्लीत जाऊन त्याच्या बंगल्याबाहेर थांबू. त्यांना संरक्षण करु. त्याचं उत्तर देण्यासाठी तमाम मल्ल सरसावले असल्याचंही आप्पासाहेब कदम यांनी सांगितलं आहे.

पैलवानाच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहणाऱ्या पवारसाहेबांची जबाबदारी त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो मल्ल घेतील, असंही आप्पासाहेब कदम म्हणाले आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने पवारांचं संरक्षण काढूून घेतल्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांसह इतर नेत्यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला.

ट्रेंडिंग बातम्या- 

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या