बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वाॅण्टेड असलेल्या गृहमंत्र्यांना पण समोर येऊन उत्तर द्यायचं आवाहन करा”

मुंबई | राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि भाजप दरम्यान राजकीय फटकेबाजी रंगली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना केंद्रिय तपास यंत्रणा त्रास देत आहेत, अशी टीका भाजपवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. तर केंद्रीय यंत्रणा त्यांचं काम करत आहेत, असं भाजप नेते म्हणत आहेत. आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

काही दिवसांपासून सीबीआय, ईडी, आयकर विभाग, एनसीबी, या केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई करायला सुरूवात केली आहे. परिणामी या तपास यंत्रणांवरून राज्यातील वातावरण तापलेलं आहे. संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीच्या प्रत्येकानं भाजपला उत्तर द्यायला हवं. याला उत्तर देताना चित्रा वाघ यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा बाहेर येवून उत्तर द्यावं, असा टोला महाविकास आघाडीला लगावला आहे.

चित्रा वाघ या आक्रमकपणे महाविकास आघाडीवर टीका करत असतात. आताही ट्विट करत त्यांनी टीका केली आहे. सर्वज्ञानी संजय राऊत साहेबांनी सर्व मंत्र्यांना विरोधकांना प्रत्युत्तर देण्याचा सल्ला दिलाय. पण त्यांना माझा एक फुकटचा सल्ला आहे. ‘वॅाण्टेड‘ असलेल्या माजी गृहमंत्र्यांना पण समोर येऊन उत्तर द्यायचं आवाहन करा. तेवढीच सरकारची उरली सुरली इज्जत वाचेल. या शब्दात चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर बोचरी टीका केली आहे.

दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना खंबीरपणे भाजपचा मुकाबला करण्याचं आवाहन केलं आहे. परिणामी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये कलगीतूरा अजून जास्त रंगण्याची शक्यता आहे.

 

थोडक्यात बातम्या 

कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान

T-20 विश्वचषकापुर्वीची ‘ती’ एक चूक अन् पाकिस्तानला मागावी लागली बीसीसीआयची माफी

कोरोना लस न घेण्याचा निर्णय आला ‘या’ अभिनेत्रीच्या अंगलट, वाचा सविस्तर

‘या’ कारणामुळे भारतीय हवाई हद्दीत घुसलं शेजारील देशाचं विमान

महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्याने रचला इतिहास, केलं 100 टक्के लसीकरण पुर्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More