गुडन्यूज! ‘या’ तारखेला लॉन्च होणार आयफोन 16?, जाणून घ्या फीचर्स

iPhone 16 series

Apple iPhone 16 | Apple कंपनी लवकरच आपले नवीन iPhone लाँच करणार आहे. कंपनी भारतात आयफोन 16 सीरीज लॉन्च करणार आहे, जी पॉवरफुल फीचर्ससह येईल. यामध्ये तुम्हाला नवीन कॅमेरा अपग्रेड पाहायला मिळतील. त्यामुळे सध्या फक्त या नवीन मोबाइलचीच चर्चा रंगली आहे.(Apple iPhone 16)

कंपनीने अद्याप या फोनबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु याच्या स्पेसिफिकेशनपासून ते लॉन्च डेटपर्यंतचे सर्व तपशील आणि फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. नुकताच त्याच्या कॅमेरा कॉन्फिगरेशनची माहिती सोशल मीडियावर लीक झाली. जाणून घेऊया iPhone 16 सीरीजमध्ये काय असेल खास.

iPhone 16 चे फीचर्स

काही मीडिया रिपोर्टनुसार, iPhone 16 आणि iPhone 16 Plus मध्ये 2X Zoom सह प्राइमरी कॅमेरा मिळेल. यासोबतच, कंपनी अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देऊ शकते, जी 0.5X झूम सह येईल. रिपोर्ट्सनुसार, iPhone 16 सीरीजमध्ये नवीन इमेज फॉरमॅट JPEG-XL देखील बघायला मिळू शकते.(Apple iPhone 16)

याचबरोबर वापरकर्त्यांना HEIF, JPEG, HEIF Max, ProRAW आणि ProRAW Max देखील मिळतील. iPhone 16 आणि iPhone 16 Plus मध्ये वर्टिकल अलाइन्ड कैमरा सेटअप देखील मिळू शकतो. यात 48MP प्रायमरी कॅमेरा मिळेल, जो f/1.6 अपर्चर सह येईल. यासोबतच कंपनी नॉन-प्रो मॉडेल्समध्ये मायक्रो फोटोग्राफी फीचर देऊ शकते. यापूर्वी हे फिचर फक्त प्रो मॉडेल्सवर उपलब्ध होते.

10 सप्टेंबररोजी iPhone 16 लॉन्च होणार?

दरम्यान, काही रिपोर्टनुसार Apple आपल्या लेटेस्ट iPhone मॉडलच्या लॉन्चसाठी 10 सप्टेंबर ही तारीख जाहीर करू शकते. तसेच आपल्या पुढील इव्हेंटमध्ये Apple नवीन फीचर्ससह नवीन Apple Watch आणि AirPods मॉडल्सही लॉन्च करु शकते. यावर्षी Apple च्या Pro मॉडलमध्ये थोडा मोठा डिस्प्ले मिळण्याची शक्यता देखील आहे. (Apple iPhone 16)

मागच्या वर्षी एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं की, कंपनी या वर्षी चार मॉडल लॉन्च करु शकते. या चारही मॉडल्सची नावं ही, iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max असतील. त्यामुळे आयफोन प्रेमी हे फोन लॉन्च होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

News Title : Apple iPhone 16 Launch Date

महत्वाच्या बातम्या-

‘या’ राज्याचे माजी मुख्यमंत्री ‘सेक्स स्कँडल’मध्ये सामील?, खळबळजनक दावा समोर

बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री राहुल गांधींच्या मागे?

आज पावसाचा ऑरेंज, यलो, रेड अलर्ट; ‘या’ भागात पाऊस धडकी भरवणार?

आमिर खान तिसरं लग्न करण्याच्या तयारीत?, स्वतःच केला मोठा खुलासा

आज कृष्ण जन्माष्टमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .