Apple iPhone | ऍपलचा (Apple iPhone ) आगामी आयफोन 17 प्रो मॅक्स (iPhone 17 Pro Max) लाँच होण्यापूर्वीच चर्चेत आहे. नुकत्याच लीक झालेल्या माहितीनुसार, ऍपल यावेळी डिझाइनमध्ये मोठे बदल करणार आहे. टायटॅनियम फ्रेमऐवजी (titanium frame) ॲल्युमिनियम (aluminum) आणि ग्लासचे (glass) कॉम्बिनेशन दिले जाऊ शकते. याशिवाय, कॅमेरा मॉड्यूलच्या (camera module) डिझाइनमध्येही बदल होण्याची शक्यता आहे.
आयफोन 17 प्रो मॅक्सचे नवीन डिझाइन
आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये यावेळी ॲल्युमिनियम आणि ग्लास बॅक (glass back) दिले जाऊ शकते. ऍपल फुल-ग्लास डिझाइन सोडून एक नवीन हायब्रिड डिझाइन (hybrid design) सादर करू शकते, जे अधिक मजबूत आणि टिकाऊ असेल. लीकनुसार, डिव्हाइसचा खालचा भाग ग्लास आणि वरचा भाग ॲल्युमिनियमचा असू शकतो.
कॅमेरा मॉड्यूलमध्येही मोठा बदल पाहायला मिळू शकतो. पूर्वीच्या स्क्वेअर कॅमेरा मॉड्यूलऐवजी (square camera module) नवीन रेक्टँगुलर डिझाइन (rectangular design) पाहायला मिळू शकते, जे कॅमेरा अपग्रेडसह येईल. आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये कॅमेरा विभागात मोठे बदल केले जाऊ शकतात. यावेळी तीन 48MP सेन्सर (sensor) असतील.
कॅमेऱ्यात सुधारणा
टेलीफोटो कॅमेरा (telephoto camera) 12MP वरून 48MP मध्ये अपग्रेड केला जाऊ शकतो. वाइड लेन्समध्ये (wide lens) मेकॅनिकल अपर्चर (mechanical aperture) जोडले जाऊ शकते, ज्यामुळे वापरकर्ते फोटोंमधील डेप्थ (depth) मॅन्युअली (manually) नियंत्रित करू शकतील. याव्यतिरिक्त, कमी प्रकाशातील फोटोग्राफी सुधारण्यासाठी नवीन AI फीचर्स (features) समाविष्ट केले जाऊ शकतात.
किंमत आणि लॉन्च तारीख
लीक्सनुसार, ऍपल आयफोन 17 प्रो मॅक्सची किंमत मागील प्रो मॅक्स मॉडेलप्रमाणेच ठेवू शकते. भारतात त्याची किंमत 1,44,900 रुपये असू शकते. आयफोन 17 प्रो मॅक्सच्या लाँच तारखेबद्दल बोलायचे झाल्यास, लीक्सनुसार, ऍपल आपली नवीन आयफोन 17 सिरीज 11 ते 13 सप्टेंबर 2025 दरम्यान लाँच करू शकते. यासोबतच आयफोन 17, आयफोन 17 एअर (Air) आणि आयफोन 17 प्रो (Pro) देखील लाँच होण्याची शक्यता आहे. (Apple iPhone )
Title : Apple iPhone 17 Pro Max Design Changes