तंत्रज्ञान

अ‌ॅपलकडून ‘स्मार्ट रिंग’ लाँच; फोनला हात न लावता ऑपरेटिंग

मुंबई | अ‌ॅपलने एक स्मार्ट रिंग लाँच केली आहे. ही रिंग बोटात घातल्यावर तुम्ही आयफोन किंवा इतर फोन तुम्ही हात न लावता ऑपरेट करु शकता. कंपनीने या रिंगसाठी पेटेंट फाईल केलं आहे. या रिंगमध्ये टचस्क्रीन, व्हॉईस कमांड आणि हँड जेस्चर कंट्रोलसारखे फीचर दिले आहेत.

पेटेंटमध्ये ड्रॉईंग ऑफ पोटेन्शल डिझाईन, रिचार्जेबल पॉवर सोर्स आणि व्हायरलेस ट्रान्स-रिसीवरसारख्या फीचर्सचा समावेश केला आहे. रिंग कोणत्याही बोटात घालू शकता. या रिंगच्या मदतीने युजर्स आयफोन आणि आयपॅडचा वापर चांगला करता येणार आहे, असं कंपनीने सांगितलं आहे.

सतत आयफोन किंवा आयपॅड हातात घेऊन फिरणं कठीण होतं. अशामध्ये ही रिंग तुमच्या उपयोगी पडू शकते. या रिंगच्या माध्यमातून तुम्ही फोनपासून थोडं लांबही उभे राहिले तरी तुम्ही फोनवर कंट्रोल ठेवू शकता.

दरम्यान, फोन कुठे विसरला आणि तो शोधायचा असल्यास तुम्ही या रिंगची मदत घेऊ शकता. या रिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या फोनचे अचूक ठिकाण शोधू शकता.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या