बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अँटीबाॅडी तयार न झाल्यानं अदर पुनावाला यांच्यासह 7 जणांविरोधात न्यायालयात अर्ज

लखनऊ | सध्या भारतात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. अनेक राज्यात मोठ्या संख्येत लसीकरण केलं जात आहे. भारतात सध्या कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पुटनिक वी या तीन लसींना मान्यता देण्यात आली आहे. शरिरात कोरोना विरूद्ध लढणाऱ्या अँटीबॉडीज तयार व्हाव्यात यासाठी लस दिली जाते. लसीकरण झाल्यानंतर शरिरात अँटीबॉडीज तयार होतात की नाही हे तपासणं देखील महत्वाचं आहे. अशाच एका घटनेनं देशात खळबळ उडाली आहे.

लखनऊ मध्ये सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांच्या विरोधात न्यायालयात खटल्याचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. सीरमची कोरोना व्हॅक्सिन कोव्हिशील्ड घेऊनही शरीरात अँटीबॉडीज तयार न झाल्यानं हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. वकिल प्रताप चंद्र यांनी अदर पुनावाला यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यानंतर अदर पुनावाला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

लखनऊमध्ये राहणारे वकिल प्रताप चंद्र यांनी 8 एप्रिलला गोविंद हॉस्पिटलमध्ये कोव्हिशील्ड व्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर 20 दिवसांनी 28 एप्रिलला त्यांनी कोव्हिशील्ड व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला. त्यानंतर त्यांच्या सामान्य प्लेटलेट कमी झाल्या होत्या. मात्र व्हॅक्सिन घेतल्यानंतरही त्यांची प्रकृती चांगली झाली नव्हती. त्यानंतर त्यांनी 25 मे रोजी अँटीबॉडीज टेस्ट केली होती. मात्र त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाले नसल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली.

त्यांनी थेट एफआयआर दाखल करण्यासाठी अदर पुनावाला यांच्यासहित 7 लोकांची नावं न्यायालयात दिली आहेत. या अर्जात केंद्रीय औषध मानक नियंत्रण, आयसीएमआरचे महासंचालक, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव, राष्ट्रीय आरोग्य मिशन उत्तर प्रदेशचे संचालक, गोविंद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर लखनऊ यांचे संचालक यांच्याविरोधात अर्ज दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

“ज्या पवारांनी त्यांची जात काढली, त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून राजू शेट्टींना अश्रू ढाळावे लागतायत”

‘केंद्राच्या परवानगीनंतरच सगळी कामं करता का?’; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापलं

महाराष्ट्रात नव्या विधानसभा अध्यक्षपदासाठी ‘हे’ नवीन नाव चर्चेत

‘4 पेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास…’; स्टेट बॅंकेच्या खातेदारांसाठी महत्वाची बातमी

‘…सरकार शहाणं झालं म्हणा’; ‘सामना’च्या अग्रलेखातून मोदी सरकारचं कौतुक अन् टोमणे एकाचवेळी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More