घरबसल्या ड्राव्हिंग लायसन्ससाठी ‘अशा’ पद्धतीनं करा अर्ज

मुंबई | तुम्हाला गाडी चालवायची असेल तर तुमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन्स असणं अत्यावश्यक आहे. कारण जर तुमच्याकडं ड्राव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्हाला मोठा दंड बसू शकतो. अशातच जर तुमच्याकडं ड्राव्हिंग लायसन्स(Driving Licence) नसेल तर तुमच्यसाठी ही माहिती उपयोगी ठरू शकते.

तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सचा फाॅर्म भरण्यासाठी आरटीओ ऑफीसला(RTO Office)जाण्याचीही गरज नाही. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा करावा, याची माहिती आपण घेऊयात.

आम्ही तुम्हाला लर्निंग ड्राव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा याची माहिती देणार आहोत. कारण शिकाऊ लायसन्स मिळाल्याच्या एक महिन्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी ड्राव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करता येतो.

लर्निंग ड्राव्हिंग लायसन्ससाठी(Learning Driving Licence) अर्ज करण्यासाठी तुम्हाला गूगलवर parivahan सर्च करावं लागेल. यानंतर तुम्हाला फाॅर्म भरण्याची वेबसाइट दिसेल. वेबसाइटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाइन सेवा हा पर्याय निवडावा लागेल.

वरील प्रोसेसनंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडण्याचा ऑप्शन दिसेल. यानंतर तुम्ही लर्निंग पर्याय निवडा आणि फाॅर्म भरा. फाॅर्मसोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्रेही सबमीट करावी लागतात. यासाठी तुम्हाला फी भरावी लागते. तसेच फाॅर्म भरताना तुम्हाला चाचणीची तारीखही निवडावी लागते.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More