Top News बीड महाराष्ट्र

विशेष पथके नेमून तातडीने आष्टीतील बिबट्याला जेरबंद करा- धनंजय मुंडे

बीड | बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात सुर्डी परिसरात वावरणाऱ्या बिबट्याला तातडीने जेरबंद करण्यासाठी विशेष पथके नेमवावीत आणि या भागात नागरिकांमध्ये पसरलेली दहशत तातडीने कमी करावी, असे निर्देश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी विभागीय वनअधिकाऱ्यांना दिले आहेत.

मंगळवारी शेतीला पाणी द्यायला गेलेले आष्टी तालुक्यातील सुर्डी येथील शेतकरी नागराज गर्जे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या गर्जेंचा मृत्यू झाला.

या घटनेबद्दल धनंजय मुंडे यांनी दु:ख व्यक्त केले. वन प्राण्याच्या हल्ल्यात मृत झाल्यास देण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या योजनेनुसार मृत गर्जे यांच्या कुटुंबियांना रोख रक्कम पाच लाख रुपये व त्यांच्या पाल्यांच्या नावे मुदत ठेव  दहा लाख रुपये देण्याचे मुंडे यांनी जाहीर केले आहे.

तसेच सुर्डी परिसरातील शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी काळजी घ्यावी. स्वत: सर्तक रहावे आणि आपल्या जनावरांना सुरक्षित स्थळी ठेवावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी तेथील नागरिकांना केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

अहमद पटेल यांच्या निधनाने महाविकास आघाडीने मार्गदर्शक गमावला- मुख्यमंत्री

कष्टकऱ्यांची भाऊबीज हा कष्टाला प्रतिष्ठा देणार उपक्रम -राधाकृष्ण विखे पाटील

अहमद पटेल यांच्या निधनाने अनुभवी, निष्ठावंत व समर्पित नेतृत्व गमावले- बाळासाहेब थोरात

फाशी दिली तरी स्विकारणार मात्र, ईडीच्या धाडीमुळे तोंड बंद करणार नाही- प्रताप सरनाईक

बेफिकर लोकांमुळे निर्बंध घालण्याचा सरकार विचार करेल- राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या