Top News पुणे महाराष्ट्र

पुणे विभागीय आयुक्तपदी सौरव राव यांची नियुक्ती

पुणे | पुणे विभागीय आयुक्तपदी आयएएस अधिकारी सौरव राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. दीपक म्हैसेकर यांनी नुकतीय सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतर सौरव राव यांची यांची पुणे विभागीय आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

सौरव राव यांनी आपल्या पदाची सुत्रे स्विकारली. यावेळी कोरोनाविरूद्धच्या परिस्थितीशी निकाराने लढण्याचा इदारा त्यांनी बोलून दाखवला. तसंच पुणे लवकरात लवकर कोरोनामुक्त करू, असा विश्वास देखील व्यक्त केला.

सौरव राव हे 2003 आएएस बॅचचे अधिकारी आहेत. ते मूळचे उत्तर प्रदेशातील असून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांत त्यांनी अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. याअगोदर त्यांनी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तसंच पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून देखील कामकाज पाहिले आहे.

दरम्यान, पुणे विभागात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. शहर तसंच ग्रामीण भागात कोरोनाने आपले हातपाय पसरले आहेत. प्रशासकीय पातळीवर उपाययोजना करून कोरोना संसर्गाला आळा घालण्याचं मोठं आव्हान राव यांच्यासमोर असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मी कृषीमंत्री होतो त्यावेळी शेतकऱ्यांवर…, एकनाथ खडसेंचा ठाकरे सरकारवर प्रहार!

अक्षय कुमारने नाशिकपाठोपाठ मुंबई पोलिसांनाही केली मदत

बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचा सुशांतसिंग प्रकरणावरून उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या