बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ATS प्रमुख जयजीत सिंग यांची ठाणे पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती

ठाणे | मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र पोलीस पथकात अधिकाऱ्यांच्या बदल्या सूरू आहेत. आता ठाणे पोलीस आयुक्त पदावर राज्याचे एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांची नियूक्ती करण्यात आली आहे. मुंबईत आढळलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करत असताना एटीएसच्याच पथकानं सचिन वाझेच्या साथीदारांना जयजीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली अटक केली होती. आता त्याच अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे.

वाझे प्रकरणात सचिन वाझे याला गुजरातमधून सिमकार्ड देणाऱ्या व्यक्तीला सुद्धा एटीएसच्याच पथकानं अटक केली होती. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्याचवेळी एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांची बदली ठाणे पोलीस आयुक्त पदावर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी दलाचे प्रमुख जयजीत सिंग यांची ठाणे पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर विनित अग्रवाल यांची एटीएस प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे पोलीस आयुक्तपदी असलेले विवेक फणसाळकर यांची काही दिवसांपूर्वी बदली करण्यात आली.

दरम्यान, विवेक फणसाळकर यांची व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. फणसाळकर यांच्या बदलीनंतर ठाणे पोलीस आयुक्तपदावर कुणाची नियुक्ती होणार याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगली होती. त्यात जयजीत सिंग यांच्या नावाचाही समावेश होता. अखेर जयजीत सिंग यांची ठाणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या –

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबाला 1 लाख रूपये देणार; मध्य प्रदेश सरकारची घोषणा

‘कोरोना व्हायरसमुळे तुम्हाला मधुमेहाचा आजार होऊ शकतो’; ICMRच्या डाॅक्टरांनी दिली महत्वाची माहिती

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणात येऊन काय दिवे लावणार आहेत?”

“फडणवीसांनी ओबीसी आणि मराठा समाजाला भडकवण्याचं राजकारण बंद करावं”

तरुणांनो तयारीला लागा, पोलीस भरतीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More