बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मिलिंद नार्वेकरांचा वाढता दबदबा, आता पुन्हा मिळाली ही मोठी जबाबदारी!

मुंबई | आपल्या देशात देवस्थानांना प्रचंड महत्व आहे. ज्या त्या राज्यातील सरकार तेथील मंदीरांचं व्यवस्थापन करत असतात. देशातील महत्वाचं देवस्थान म्हणून तिरूपती देवस्थानची ओळख आहे. देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या मंदीराला भेट देत असतात. परिणामी या देवस्थानच्या सदस्यांना फार महत्व आहे.

आंध्र प्रदेश सरकारने देशभरातून 24 तज्ज्ञ लोकांची तिरूपती देवस्थानच्या सदस्यपदी निवड केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलींद नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. नार्वेकर यांच्या निवडीने महाराष्ट्राला प्रतिनिधीत्व मिळालं आहे.

देशभरातील मोठ्या देवस्थानात तिरूपतीचा समावेश होतो. सर्वात प्रतिष्ठीत म्हणून आंध्र प्रदेशातील तिरुमला ठिकाणी असलेल्या तिरुपती देवस्थानाची ख्याती आहे. देशभरातून असणारी भक्तांची गर्दी लक्षात घेता आंध्र प्रदेश सरकार नेहमी तिरूपती देवस्थानच्या योग्य व्यवस्थपनाकडे लक्ष देत असतं.

मिलींद नार्वेकर सध्या राज्याच्या राजकारणातील महत्वाचा चेहरा आहेत. शिवसेनेच्या शाखाप्रमुख पदाच्या निवडीसाठी गेलेल्या नार्वेकरांना उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक करण्यात आलं होतं. तेव्हापासून नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केलं आहे. सध्या नार्वेकर हे शिवसेनेचे सचिव सुद्धा आहेत. नार्वेकर यांच्या तीरूपती देवस्थानवरील निवडीने नार्वेकर यांची राजकीय ताकद लक्षात येत आहे.

थोडक्यात बातम्या 

चेन्नई सुपर किंग्जसाठी वाईट बातमी; सामन्याआधी चेन्नईचं टेंशन वाढलं

देवेंद्र फडणवीसांनंतर आता योगी आदित्यनाथ यांनीही दिला ‘मी पुन्हा येईन’चा नारा

उत्तर प्रदेशचं रणांगण जिंकण्यासाठी आठवलेंचा भाजपला सल्ला, राजकीय गणितेही सांगितली!

बॉसनं पगार न दिल्यामुळे पठ्ठ्यानं उचललं धक्कादायक पाऊल…, पाहा व्हिडीओ

‘लहान मुलं कोरोनामुक्त झाले तरी…’; संशोधनातून चिंतेची बाब समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More