बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती

सोलापूर | रणजितसिंह डिसले गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

याअंतर्गत जगभरातील मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे आदी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जगभरातील 12 व्यक्तींची सल्लागार म्हणून निवड केली आहे.

या समितीच्या माध्यमातून तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून 21व्या शतकातील शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डिसले गुरुजींनी सांगितलं.

दरम्यान, ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या आणि ओघाओघाने भारत देशाच्याही शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. डिसले गुरुजी यांच्या नावाने इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप अर्थात शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

थोडक्यात बातम्या- 

हर्षवर्धन पाटील यांनी घेतली पृथ्वीराज चव्हाणांची भेट; सरकारकडे केली ही महत्वाची मागणी

‘छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा’; ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले हे 3 महत्वाचे निर्णय; पाहा एका क्लिकवर

‘मातोश्री’ने आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही ‘मातोश्री’वर जाणं बंद केलं नाही- देवेंद्र फडणवीस

मी पुराव्यांसह सांगतोय, कोरोनामुळे झालेल्या मृत्युसाठी मोदीच जबाबदार- असदुद्दीन ओवैसी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More