पुणे महाराष्ट्र

शिवसेनेच्या ‘या’ खासदाराची संसदेच्या फायनान्स कमिटीपदी नियुक्ती

Loading...

पुणे : मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची संसदेच्या फायनान्स या महत्वाच्या पदावर कमिटीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

31 सदस्यीय या समितीत महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे राज्यसभा सदस्य प्रफूल्ल पटेल आणि भाजपचे लोकसभेतील खासदार डॉ. सुभाष भामरे, मनोज कोटक आणि गोपाळ शेट्टी यांचाहा समावेश आहे. माजी अर्थमंत्री जयंत सिन्हा हे कमिटीचे अध्यक्ष आहेत.

Loading...

खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये बारणे संसदेच्या डिफेन्स आणि ट्रान्सपोर्ट कमिटीवर होते. तर दुसऱ्या टर्ममध्ये त्यांचे प्रमोशन होऊन त्यांना वित्तीय समिती मिळाली आहे.

13 सप्टेंबर स्थापन झालेल्या फायनान्स कमिटीत लोकसभेतील 21 तर राज्यसभेतील 10 सदस्य आहेत. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांमध्ये या समितीचा मोठा वाटा असतो.

Loading...

महत्वाच्या बातम्या- 

Loading...

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या