बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्राच्या विरोधाला न जुमानता उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

मुंबई | महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून राज्य (MVA Goverment) आणि केंद्रादरम्यानचा (Central goverment) संघर्ष वाढल्याचं पहायला मिळालं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला न जुमानता काही निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या कार्यकाळावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार पुन्हा एकमेकांसमोर उभं ठाकल्याचं चित्र सध्या सर्वत्र आहे.

राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांचा कार्यकाळ संपल्यानं राज्य सरकारनं त्यांचा कार्यकाळ वाढवण्याची विनंती केंद्राला केली होती. पण केंद्र सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रस्ताव न आल्यानं सिताराम कुंटे यांना आपला पदभार देबाशिष चक्रवर्ती यांना सोपवावा लागला आहे. सिताराम कुंटे यांनी राज्याच्या मुख्य सचिव पदाचा राजीनामा दिला असला तरी राज्य सरकारकडून त्यांची नियुक्ती महत्त्वाच्या पदावर करण्यात आली आहे.

सिताराम कुंटे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. अडचणीच्या काळात राज्याच्या प्रशासनाला व्यवस्थितपणे हाताळण्याचं काम कुंटे यांनी केलं आहे. परिणामी त्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव पदी करण्यात आली आहे. परिणामी केंद्रानं मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ वाढवला नसला तरी कुंटे हे मुख्यमंत्री कार्यालयातील महत्त्वाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहेत.

दरम्यान, कुंटे यांच्याकडून चक्रवर्ती यांनी पदभार स्विकारला आहे. चक्रवर्ती यांच्या समितीनंच परमबीर सिंग यांच्या विरोधातील आरोपांची चौकशी केली होती. चक्रवर्ती 1986 च्या बॅचचे आयएएस आहेत.

थोडक्यात बातम्या 

लगीन घाई बरी नाही! नवरा-नवरीच्या फजितीचा व्हिडीओ तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

ओमिक्रॉन विषाणूने जगाचं टेन्शन वाढवलं, रूग्णसंख्येबाबत धक्कादायक माहिती समोर

मोठी बातमी! गोव्यात काॅंग्रेसचा भाजप आणि टीएमसीला जोर का झटका

सरकारची मोठी घोषणा; मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर

‘केवळ नाव राष्ट्रवादी, काम मात्र कुटुंबवादी’; शिवसेना नेत्याची राष्ट्रवादीवर गंभीर टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More