बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! कोरोनावर आणखी एका औषधाला मंजुरी, ऑक्सिजनची गरज होणार कमी

नवी दिल्ली | देशभरासह संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यातच सुरुवातीला कोरोनासाठी कोणत्याही प्रकारचं ठोस औषध नव्हतं. मात्र त्यानंतर आता भारतामध्ये दोन लसींचं उत्पादन होत आहे. मात्र अशातच भारत सरकारच्या औषध नियामक संस्थेने डीआरडीओ बनवलेल्या 2 डेक्सोय डी ग्लुकोजच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.

भारतातील कोरोना ग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समजत आहे.  2 डेक्सोय डी ग्लुकोजचं उत्पादन मोठ्या प्रमाणात करता येईल, असंही डीआरडीओने म्हटलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारपद्धती ऐवजी 2 डेक्सोय डी ग्लुकोजचा वापर पर्यायी उपचार पद्धती म्हणून केला जाईल. या औषधाची निर्मिती डीआरडीओच्या आयएमएस आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी एकत्रितपणे केली आहे.

या औषधाच्या चाचण्या केल्या गेल्या तेव्हा याचा डोस घेतलेल्या रुग्णांमध्ये याची सकारात्मक लक्षण दिसून आली आहेत. रुग्णांचा बरा होण्याचा वेग चांगला असून ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी होतं, असंही डीआरडीओकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, डीआडीओनं विकसित केलेलं हे औषध पावडर स्वरुपात मिळतं. हे पाण्यामध्ये टाकून घ्यावं लागते. हे औषध संसर्ग झालेल्या पेशींमधील विषाणूंचा संसर्ग कमी करण्यासोबत संसर्ग रोखण्याचं काम करत. त्यासोबतचं रुग्णाच्या शरीरातील उर्जा वाढवण्याचंही काम करत असल्याचं समजत आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

‘स्वामी…स्वामी..स्वामी…’म्हणत अंकिता लोखंडेने घेतली कोरोनाची लस, व्हिडीओ होतोय व्हायरल

भारतात लसीचा साठा कमी असताना इतर देशांना पुरवठा कशासाठी?, परराष्ट्र मंत्री म्हणाले…

पुण्यात एका पाठोपाठ एक गुन्हा! बदला घेण्यासाठी रचला फिल्मी कट, पेटवली कार

‘आम्हाला नियुक्त्या द्या, आता आम्ही हताश झालोय’; MPSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं पत्र व्हायरल

“कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात नरेंद्र मोदी अपयशी आणि हतबल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More