बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जगप्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टेस्ला लवकरच भारतीय बाजारात; ‘या’ चार इलेक्ट्रिक गाड्यांना मंजुरी

नवी दिल्ली | वाढत्या इंधन दरावर मात करण्यासाठी देशात नवं इलेक्ट्रिक वाहन धोरण राबवलं जात आहे. या इलेक्ट्रिक वाहन धोरणामुळे प्रदुषणाला देखील आळा बसणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने या इलेक्ट्रिक धोरणाला मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे देशातील विविध कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहनांवर भर देताना दिसत आहे.

देशातील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवण्यासाठी अधिकाधिक कंपन्यांना परवानगी दिली जात आहे. भारतीय कार बाजाराला ईव्ही जायंट टेस्लाच्या एंट्रीची प्रदीर्घ काळापासून प्रतिक्षा होती. ती प्रतिक्षा आता संपलेली आहे. टेस्ला कंपनीला देशातील त्यांच्या चार मॉडेल्सचे उत्पादन किंवा आयात करण्यास मान्यता मिळाली आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने ही परवानगी दिली आहे. यात मॉडेल 3 आणि मॉडेल Y चे व्हेरिएंट्स आहेत.

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी यापुर्वीच भारतीय बाजारात उतरण्याचे संकेत दिले होते. त्याप्रमाणे टेस्ला ही भारतीय बाजारात आता आपली इलेक्ट्रिक गाडी उतरवणार आहे. यासाठी भारत सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. भारत सरकारने ईलेक्ट्रिक गाडी उत्पादकांना स्थानिक खरेदीला गती देण्यास सांगितले होतं.

दरम्यान, टेस्ला ही आपल्या दर्जेदार उत्पादनासाठी ओळखली जाते. भारत सरकाने इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणण्याचं धोरण आखल्यापासून टेस्ला कंपनी मंजुरीसाठी प्रयत्न करत होती. याआधी भारत सरकाने महिंद्रा, टाटा या कंपन्यांना इलेक्ट्रिक गाडी बाजारात आणण्यासाठी परवानगी दिली आहे.

थोडक्यात बातम्या 

पुढील तीन दिवस महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका; घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा ‘इतक्या’ रूपयांनी महागला

‘8 पदरी रस्ता, 6 पदरी पुल अन् वर मेट्रो’; नितीन गडकरींचं पुण्यासाठी मोठं स्वप्न!

‘युपी निवडणुकीआधी बड्या हिंदू नेत्याची….’; राकेश टिकैत यांचं वादग्रस्त वक्तव्य

“थोडं थांबा… दिवाळीनंतर आपलंच सरकार येणार”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More